शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन वादावर आता पडदा टाका !

By admin | Updated: January 14, 2016 02:31 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता

मुंबई/पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता, परंतु त्यांनी आता माफी मागितली असल्याने सर्व वादावर पडदा टाका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. साहित्य संमेलनाला मी जाणार नाही, असे कधीही म्हटलेले नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला जाणार असल्याचे संकेत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिले. तर पुण्यात भाजपाचे खा. अमर साबळे यांनीही वादावर पडदा टाकल्याचे सांगितले. इतर साहित्यिकांबरोबर सबनीस यांचेही स्वागत करू, असे साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यापुढे भाषणातून वादग्रस्त विधान येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, की साहित्य संमेलनाच्या आयोजनाला आमचा कधीच विरोध नव्हता. सबनीस यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आमचा आक्षेप होता. त्यांनी स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंतप्रधानांबाबत असे विधान केले. (विशेष प्रतिनिधी) महामंडळाच्या कारभाराविरोधात तक्रारकाही साहित्यिकांनी एकत्र येत महामंडळाच्या कारभाराविरोधात विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद अडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. मुरलीधर साठे, अनिल कुलकर्णी आणि अशोक मुळे यांनी ही तक्रार केली असून, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, महेश केळुस्कर, सुहास सोनावणे, अरुण म्हात्रे, भारत सासने, राजन खान, अ‍ॅड. सतीश गोराडे, मुकुंद आवटे अशा साहित्यिकांनी तक्रारीस पाठिंबा दिला आहे.संमेलनात आपण स्वत: उपस्थित राहू. अगदी सबनीसांचेही स्वागत आम्ही करू. हे संमेलन दिमाखात पार पाडण्यासाठी भाजपा व सरकार म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार आहे. - खा, अमर साबळे, भाजपा