शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

१६ कैद्यांचे जबाब नोंदविण्यास न्यायालयाचा हिरवा कंदील

By admin | Updated: July 14, 2017 05:35 IST

दंगलीच्या गुन्ह्यांत अखेर १६ जणींचे जबाब नोंदविण्यास गुन्हे शाखेला न्यायालयाकडून गुरुवारी हिरवा कंदील मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण आणि त्यानंतर झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यांत अखेर १६ जणींचे जबाब नोंदविण्यास गुन्हे शाखेला न्यायालयाकडून गुरुवारी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे.मंजुळाच्या हत्येप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जेलर मनीषा पोखरकरसहित सहाही जणी पोलीस कोठडीत आहेत. शुक्रवारी त्यांची कोठडीची मुदत संपत आहे. मंजुळाच्या हत्येसह भायखळा कारागृहात घडलेल्या दंगलीचा तपासही गुन्हे शाखेकडे आहे. या प्रकरणात तब्बल २९१ कैद्यांचे जबाब नोंदविण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळत नव्हती. या कैद्यांच्या विभागीय गुन्हेगारीनुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली. वर्गवारीनुसार संबंधित कैद्यांची जबाबदारी गुन्हे शाखेच्या १२ही कक्षांना वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सर्व पथक या महिला कैद्यांचे जबाब नोंदवून घेत आहे. तसेच या प्रकरणातील अन्य १६ जणींचे जबाब नोंदविण्यासाठीही गुन्हे शाखेला गुरुवारी न्यायालयाकडून परवानगी मिळाली.कारागृह अधीक्षक सुटीवर...मंजुळा शेट्येला मारहाण झाली त्या दिवशी भायखळा कारागृहाचे अधीक्षक इंद्रमणी इंदुरकर सुटीवर होते. तिच्या मृत्यूनंतर त्यांना रात्रीच घटनेबाबत समजले होते. त्या वेळेस हजर राहणे अपेक्षित असतानाही ते हजर राहिले नाहीत. ते दुसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले. तसेच त्यांनी वरिष्ठांनाही अपुरी माहिती पुरविल्याचे कारागृहात सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीतून समोर येत आहे.