शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे

By admin | Updated: July 11, 2014 23:50 IST

फिर्यादीने न्यायालयात सांगितलेल्या बाबी आणि जबाबात साम्य नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांनी नगरसेवक प्रशांत शितोळेसह चौघांची गुरुवारी सुटका केली.

पुणो : नवरात्रोत्सव मिरवणुकीत तरुणाचा खून केल्याप्रकरणी व्यवस्थित तपास न केल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढताना  फिर्यादीने न्यायालयात सांगितलेल्या बाबी आणि जबाबात साम्य नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. ढवळे यांनी नगरसेवक प्रशांत शितोळेसह चौघांची गुरुवारी सुटका केली. 
प्रशांत कृष्णराव शितोळे (36, रा. स्नेहांकित बंगला, शितोळेनगर, सांगवी), गणोश बाजीराव ढमाले (24), अमित दिलीप गांधी (27) व हर्षल माकर (27, तिघेही रा. सांगवी) अशी सुटका करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. 
फिर्यादींना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रात्री दोन वाजेर्पयत उपचार सुरू होते. मात्र, पोलिसांनी नोंदविलेली फिर्याद रात्री साडेबाराच्या सुमारास कशी नोंदविली गेली, बेशुध्द असताना तक्रार कशी नोंदवून घेण्यात आली, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
तसेच साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी सात दिवसांनी नोंदविल्याने, फिर्यादीच्या सांगण्यात आणि जबाबात तफावत आढळल्याने गुन्ह्याचा पोलिसांनी योग्य तपास लावला नाही, असे ताशेरे मारत न्यायालयाने आरोपींची मुक्तता केली. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. हेमंत झंजाड, अॅड. एन. डी. पवार, अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. विजय नहार यांनी काम पाहिले.  (प्रतिनिधी)
 
3 ऑक्टोबर 2क्11 रोजी रात्री पावणोअकरा वाजण्याच्या सुमारास नवरात्र तोरण उत्सवात जय गणोश मित्र मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. जुनी सांगवी ते शितोळेनगर अशी मिरवणूक जात असताना तुषार राजेंद्र ढोरे (रा. सांगवी), फिर्यादी गणोश सुभाष ढोरे (25, रा. सांगवी) व अजिंक्य ढोरे हे दुचाकीवरून जात असताना वाद झाला. तुषार ढोरेवर तलवारीने वार करून त्याचा जागीच खून केला होता, तर गणोश ढोरे यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.