शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

.....जावे ‘इमोजीं’च्या देशा !

By admin | Updated: July 17, 2016 18:19 IST

‘फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो. शब्दांपेक्षा या इमोजींच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे सोपे होत आहे

स्नेहा मोरे,  मुंबई‘फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो. शब्दांपेक्षा या इमोजींच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे सोपे होत आहे. १७ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड इमोजी डे’ म्हणून सेलीब्रेट होतो आहे. याच निमित्ताने या इमोजींच्या

विश्वाचा ग्लोबल पसारा दिवसागणिक विस्तारतोय याचीच प्रचिती येते. शब्दांपेक्षा आपण या इमोजींना आपलेसे का केले, यामागचे उत्तर नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. इमोजींच्या वापराविषयी १ जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीचा अभ्यास करण्यात आला. नुकत्याच या इमोजींबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘जॉय’ ही इमोजी देशभरात सगळ्यात जास्त शेअर करण्यात आली आहे.

‘टिष्ट्वटर’ने तर खासकरून या दिनानिमित्त हा दिवस ‘फुल्ल’ इमोजी स्पेशल करायचा ठरवला आहे. त्यासाठी खास स्पेशल इमोजी डिझाइन केले असून ‘#वर्ल्ड इमोजी डे’ या हॅशटॅगने शेअर केला जाणार आहे. शिवाय, एक गमतीची गोष्ट म्हणजे ‘कॉफी’च्या इमोजीपेक्षा ‘बिअर’ची इमोजी युजर्सने सगळ्यात जास्त शेअर केली आहे आणि ‘हार्टब्रेक’च्या इमोजीपेक्षा ‘फुलहार्ट’ची इमोजीही टिष्ट्वटरवर हिट ठरली आहे.

युनिक इमोजी वापरण्यात भारत काहीसा ‘फ्रंटफूट’वर आहे. युनिक इमोजीमध्ये ‘नमस्ते’, ‘परफेक्ट’ आणि ‘थम्ब्स अप’ यांचे शेअरिंग सर्वाधिक झाले आहे. तर देशाच्या कॅनव्हासवर सगळ्यात जास्त वापर होणाऱ्या टॉप टेन्स इमोजीमध्ये ‘जॉय’, ‘हार्ट आयस्’, ‘नमस्ते’, ‘क्लॅप’, ‘किसिंग हार्ट्स’, ‘परफेक्ट’, ‘ब्लश’, ‘थम्ब्स अप’, ‘डान्सर’ आणि ‘फायर’ यांनी स्थान मिळवले आहे.‘क्रायिंग विथ लाफ्टर’ इमोजी हिट!२०१५ साली खऱ्या अर्थाने इमोजी मेनस्ट्रीममध्ये आल्या. गेल्या वर्षभरात इमोजींचा वापर वाढतो आहे. यातच गेल्या वर्षी टिष्ट्वटरवर ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ ही इमोजी ६.६ बिलिअन्स युजर्सने वापरली होती. त्यानंतर ‘हार्ट आयस्’चा सर्वाधिक वापर झाला होता.