शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेच्या डोक्यात पतीने घातला प्रचाराचा नारळ!

By admin | Updated: February 6, 2017 04:40 IST

शिवसेनेच्या उमेदवाराने वादविवादातून ठाण्यातील प्रभाग क्र. १६ च्या विद्यमान नगरसेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात नारळ मारल्याची घटना रविवारी सकाळी शांतिनगरात घडली

ठाणे : शिवसेनेच्या उमेदवाराने वादविवादातून ठाण्यातील प्रभाग क्र. १६ च्या विद्यमान नगरसेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात नारळ मारल्याची घटना रविवारी सकाळी शांतिनगरात घडली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रभाग क्र. १६ च्या नगरसेविका संगीता पाटील यांचा त्यांचे पती माणिक पाटील यांच्याशी गत काही वर्षांपासून कौटुंबिक वाद आहे. गत ३ वर्षांपासून ते वेगवेगळे राहतात. कौटुंबिक न्यायालयात त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संगीता पाटील दररविवारी वॉर्डातील स्वच्छतेचा आढावा घेतात. त्यानुसार, त्या रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत शांतीनगरातील हनुमान मंदिराजवळ स्वच्छतेचा आढावा घेत असताना, रस्त्यात त्यांचे पती माणिक पाटील कार्यकर्त्यांसोबत भेटले. संगीता पाटील यांनी पतीला बाजूला होण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाला. वाद वाढून शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. या वादात माणिक पाटील यांनी हातातील प्रचाराचे नारळच संगीता पाटील यांच्या डोक्यात मारले. दोघांमधील भांडणातून त्यांचे कार्यकर्तेही आपसात भिडले. यात संगीता पाटील यांचे कार्यकर्ते गणेश जाधव यांनाही मारहाण झाली.संगीता पाटील यांनी याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माणिक पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. ठाण्यात महापालिका निवडणूक रंगात आली आहे. शिवसेनेने या वेळी संगीता पाटील या विद्यमान नगरसेविका असल्या तरी त्यांना डावलून माणिक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)