शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीन दरात घसरण!

By admin | Updated: January 29, 2015 23:25 IST

राज्यातील शेतक-यांना दरवाढीची प्रतीक्षा.

अकोला : अल्प पावसामुळे यंदा कापूस उत्पादकांच्या पदरी निराशा आली असून, कापसाचा एकरी उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्‍यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, खासगी बाजारातील कापसाचे दर शेतकर्‍यांना परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या दरातही या महिन्यात प्रति क्विंटल शंभर ते सव्वाशे रुपये घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे; पण चांगले भाव मिळतील, या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आस लावून बसला आहे.गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले, यावर्षी पाऊसच नसल्याने कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर शेतकरी असताना, जानेवारी महिन्यात खासगी बाजारात ३३00 रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर १00 ते १२५ रुपयांनी घसरले. हमी दर २६५0 ते २८00 रुपये प्रतिक्विंटलच्यावर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाचे हमी दर ४0५0 रूपये प्रतिक्विंटल आहेत, पण प्रतवारीचे निकष लावून शेतकर्‍यांना ३९00 रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. याच दराने भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) राज्यात ५५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र सोडला, तर इतर राज्य मिळून सीसीआयने देशात तीन क्विंटल कापूस खरेदी केला आहे.सोयाबीन आणि कापसाचे भाव खासगी बाजारात कमी झाले असून, कापसाचे भाव वाढतील, अशी सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. जगाच्या तुलनेत भारतातील हे दर बरेच म्हणावे लागतील, असा निष्कर्ष अकोला येथील कापूस व्यावसायिक बसंत बाछुका यांनी काढला.