शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे उत्पादन घटले !

By admin | Updated: November 9, 2014 23:47 IST

पश्‍चिम विदर्भात हेक्टरी चार ते पाच क्विंटलचाच उतारा

अकोला : उशिराने आलेला मान्सून आणि पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने िपकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात कापसाचे उत्पादन ३0 ते ४0 टक्के कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भात हेक्टरी केवळ चार ते पाच िक्ंवटलचाच उतारा असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात कापसाचे जवळपास ४0 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी विदर्भात १७ लाख, मराठवाड्यात १५ लाख, आणि उर्वरित क्षेत्र खान्देशात आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी २३ जुलैनंतर पेरणीला सुरुवात केली. बीटी कापूस पेरणीची वेळ १५ जुलैपर्यंत होती; तथापि शेतकर्‍यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बीटीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने का पसाच्या झाडांची वाढ खुंटली. या अपरिपक्व कापसाच्या झाडाला फुलोरा येण्यास सुरू वात झाली होती. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला.गतवर्षी कापसाला अतवृष्टीचा फटका बसेल, असे वाटले होते; मात्र जवळपास ३७0 लाख गाठींचे उत्पादन झाले. ११0 लाख गाठींची निर्यातही झाली होती. विदर्भाचा विचार केल्यास यंदा कापसाचे सर्वाधिक १0 लाख हेक्टर क्षेत्र पश्‍चिम विदर्भात आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती जिल्हा सोडला तर अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ांत सरासरी ४0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्याचा परिणाम कापूस पिकावर झाला आहे.उशिरा पेरणी झाल्यामुळे नैसर्गिकरित्याच कमी उत्पादनाची शक्यता असते. यावर्षी उशिरा पेरणी झाली. शिवाय ऐन पीक वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. परतीच्या पावसानेही धोका दिला. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात घट अ पेक्षितच असल्याचे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस संशोधक डॉ. टी. एच. राठोड यांनी स्पष्ट केले.