शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघर पाणी योजनांमध्ये भ्रष्टाचार

By admin | Updated: February 25, 2016 02:46 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे

मुंबई : ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे अशा गंभीर बाबी समोर आल्या असून या प्रकरणी संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील आणि रकमेची संबंधितांकडून वसुलीही केली जाईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. या दोन जिल्ह्यांत गेल्या १० वर्षांत हाती घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी लोणीकर यांनी संबंधित यंत्रणेला कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आ. किसन काथोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता हेमंत लांडगे, तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा योजनेच्या कामाची तपासणी विभागीय आयुक्त आणि गुणवत्ता पथक यांच्या मार्फत करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ६२२ व पालघर जिल्ह्यातील ९४२ अशा एकूण १५६४ नळ पाणी पुरवठा व साधी विहिर योजनेच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी ठाणे जिल्ह्यातील ६२२ योजनांपैकी ४७८ योजनांची तसेच पालघर जिल्ह्यातील ९४२ योजनापैकी ६३८ योजनांची तपासणी केली असून ज्या योजनांची तपासणी अजूनपर्यंत झाली नाही त्या पाणी पुरवठा योजनांची तपासणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)वेतनवाढ रोखणार... जनतेला पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची असून जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये कामात निष्काळजीपणा केल्याचा शेरा देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना मिळणारी वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांना बढतीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारची कार्यवाही केल्याशिवाय अधिकारी वर्ग जनतेची कामे आत्मीयतेने करणार नाहीत असेही लोणीकर यांनी बजावले.