शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग फेररचनेच्या प्रतीक्षेत नगरसेवक

By admin | Updated: August 25, 2016 06:03 IST

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले

मुंबई: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र, आरक्षणातून आपला वॉर्ड सुटला, तरी फेररचनेत काय होईल, या भीतीने नगरसेवक सध्या धास्तावले आहेत़ त्यातच प्रभागांची फेररचना नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे़ या बदलेल्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा वेळ मिळत असल्याने नगरसेवकांचे टेंशन वाढले आहे़ महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ यामुळे इच्छुक नगरसेवक व पक्षातील कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ मात्र, प्रचाराला सुरुवात करण्याआधी आरक्षणाची सोडत आणि त्यात आता प्रभागांच्या फेररचनेकडे नगरसेवक डोळे लावून बसले आहेत़ सोडतीमध्ये आपल्या वॉर्ड महिला अथवा मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाल्यास, जवळच्या वॉर्डांमध्ये चाचपणी करण्यास नगरसेवकांनी या पूर्वीच सुरुवात केली आहे़ सणासुदीचा काळ हा मतदारसंघामध्ये प्रचारसाठी, घरोघरी पोहोचण्याकरिता बेस्ट असल्याने, फेरचनेची प्रक्रिया त्या पूर्वी पूर्ण व्हावी, अशी नगरसेवकांना आशा होती़ मात्र, प्रभाग फेररचनेचे निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होत असल्याने नगरसेवकांची सर्व गणिते बिघडली आहेत़ त्यातही आशावादी असलेल्या नगरसेवकांनी आपल्या व बाजूच्या वॉर्डात नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे़ (प्रतिनिधी)>सणातील प्रचारावर पाणी५ आॅक्टोबर रोजी प्रभाग फेररचनेचा मसुदा जाहीर होणार आहे़ त्यामुळे नगरसेवकांना आपल्या वॉर्डाचा अंदाज येईल़ मात्र, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र असे सण त्या पूर्वीच येत असल्याने ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नगरसेवकांनी सुवर्णसंधी हुकणार आहे़>असा आहे फेररचनेचा कार्यक्रमप्रभाग फेररचनेचा ५ आॅक्टोबरपर्यंत मसुदा तयार होईल़ हा मसुदा प्रकाशित केल्यानंतर, २० आॅक्टोबर रोजी सूचना व हरकती मागविण्यात येतील़ १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोग प्रभाग फेररचनेवर अंतिम निर्णय घेईल़ त्यानंतर, २२ नोव्हेंबरला आयुक्त प्रभाग फेररचनेची अंतिम यादी जाहीर करतील़