शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

नगरसेवकांनी झुगारला पक्षादेश

By admin | Updated: March 2, 2015 02:10 IST

परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश काँग्रेसच्या १५ पैकी ११ नगरसेवकांनी धुडकावल्याचा

कल्याण : परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश काँग्रेसच्या १५ पैकी ११ नगरसेवकांनी धुडकावल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सचिन पोटे यांनी केला आहे. यासंदर्भातला अहवाल सोमवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे पक्षाचा व्हिप बजावण्याची जबाबदारी असलेले गटनेते सदाशिव शेलार यांचाही पक्षादेश धुडकावणाऱ्यांमध्ये समावेश आहे. परिवहनच्या सदस्य निवडणुकीत ६ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसच्या वतीने मनीष देसले हे अधिकृत उमेदवार होते, परंतु शैलेंद्र भोईर यांनी उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केली. निवडणुकीत भोईर यांना सहाव्या क्रमांकाची (७६) मते मिळाली तर देसले यांना केवळ २४ मते मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अधिकृत उमेदवाराचा पराभव पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भातला अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविला जाणार आहे. केडीएमसीत काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. गटनेते शेलार यांच्यासह उदय रसाळ, शर्मिला पंडित, वंदना गीध, साबीर कुरेशी, भरत पाटील, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर, नंदू म्हात्रे आणि शिल्पा शेलार या नगरसेवकांनी बंडखोर उमेदवार भोईर यांना मतदान के ले, तर नगरसेवक रवि पाटील यांनी त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन पाटील यांना मतदान केल्याचा ठपका जिल्हाध्यक्ष पोटे यांनी अहवालात ठेवला आहे.