शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा बचत उपक्र माला सहकार्य करा

By admin | Updated: July 15, 2014 01:13 IST

वीज टंचाई विचारात घेता महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला एक तास ऊर्जा बचत करण्याचा उपक्र म राबविला जातो. या उपक्र माला सहकार्य करा असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या

महापालिका : महापौरांचे नागरिकांना आवाहन नागपूर : वीज टंचाई विचारात घेता महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला एक तास ऊर्जा बचत करण्याचा उपक्र म राबविला जातो. या उपक्र माला सहकार्य करा असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले. गुरुपौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीनगर चौकात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. पौर्णिमेला लक्ष्मीनगर चौकाकडून आठरस्ता चौक, माटे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद ठेवण्यात आले. लक्ष्मीनगर चौकात मनपा अधिकारी व ग्रीन व्हिजन फाऊंडेशनचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून ऊर्जा बचतीचे आवाहन केले. पौर्णिमेला ऊर्जा बचत करतो. सोबतच दैनंदिन वापरातही वीज बचत करा. प्रतिष्ठान, कार्यालयात वीज उपकरणांचा अनावश्यक वापर टाळा, असे आवाहन सोले यांनी केले. एक युनिट वीज निर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. सोबतच १००० ग्रॅम कार्बनडाय आॅक्साईड वायुचे उत्सर्जन होते. त्यामुळे वीज वाचवा, पृथ्वी वाचवा व पौर्णिमा दिवस साजरा करा, असे आवाहन सोले यांनी नागरिकांना केले. गुरुपौर्णिमेला रात्री एक तास शहरातील पथदिवे बंद ठेवून १५५ युनिट वीज बचत करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता अरुण मानकर, ग्रीन व्हिजन फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, दक्षता बोरकर, सुरभी जैस्वाल, हेमंत अमेसार, राहुल राठोड यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)