शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

चेतन भगत साधणार विदयार्थ्यांशी संवाद

By admin | Updated: October 5, 2016 00:55 IST

लेखनशैलीतून अवघ्या तरुणाईला भुरळ जो भुरळ घालतो.. ज्याच्या पुस्तकावर हमखास चित्रपट बनतो... तो स्वत: एक स्टाईल आयकॉन आहे..

पुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा लेखनशैलीतून अवघ्या तरुणाईला भुरळ जो भुरळ घालतो.. ज्याच्या पुस्तकावर हमखास चित्रपट बनतो... तो स्वत: एक स्टाईल आयकॉन आहे... असा आघाडीचा व नव्या पिढीचा लेखक म्हणजे चेतन भगत. त्याच्याशी मनमोकळा आणि दिलखुलास संवाद साधण्याची संधी पुणेकरांना आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. साईबालाजी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स आणि लोकमत नॉलेज फोरम यांच्या माध्यमातून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्याशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल वेस्टीन येथे होणार आहे. 'हाऊ टू बी अ सुपर अ‍ॅचिव्हर' हा त्यांच्या संवादाचा प्रमुख विषय असणार आहे. पुण्यातील नामांकीत महाविद्यालयांतील विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील प्रतिथयश व मान्यवर व्यक्तींचाही सहभाग या कार्यक्रमास असणार आहे. चेतन भगत हे विशेषत: तरुण मुलांमध्ये लेखक म्हणून अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याचे आघाडीचे बेस्टसेलर लेखक म्हणून त्यांचे नाव देशविदेशात सन्मानाने घेतले जाते. भारतीय लेखक, स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. फाईव्ह पॉईंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स आॅफ माय लाईफ, मेकिंग इंडिया आॅसम ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलीवूडमध्ये ३ इडियट्स, काय पो छे, टू स्टेट्स असे गाजलेले चित्रपटही बनलेले आहेत. विविध संस्था संमेलनांतून ते व्याख्यानेही देतात. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना या निमित्ताने मनमोकळी उत्तरे चेतन भगत देणार आहेत. कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. कार्यक्रमाचे डिजीटल पार्टनर जिओ असून सिंहगड इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता, केंम्ब्रीज, चाटे संस्था हे अ‍ॅकेडेमिक पार्टनर आहेत. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.