शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील जंगल सफारीसाठी नियमावली

By admin | Updated: November 28, 2015 00:16 IST

तिकीटही आकारण्याचा विचार : स्थानिकांच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम सुरू

अनंत जाधव -- सावंतवाडी-आंबोलीतील वन्यप्राण्यांची तसेच वनौषधींची जंगल सफारीच्या निमित्ताने तस्करी होऊ नये तसेच सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांपासून वन्यप्राणी तसेच वनौषधींना धोका पोहोचू नये, यासाठी वनविभाग स्थानिक वनसंरक्षक समितीच्या माध्यमातून नियमावली तयार करणार आहे. तसेच जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना तिकीटही आकारले जाणार आहे. याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या वनक्षेत्रपालांच्या स्तरावर सुरू आहे. तो लवकरच अंतिम मंजुरीसाठी उपवनसंरक्षकाकडे पाठविणार आहेत.आंबोलीत पावसाळी, उन्हाळी आणि हिवाळी अशा तीन टप्प्यांत पर्यटन सफर असते. पर्यटकांचा जंगल सफर हा आवडीचा विषय आहे. आंबोलीच्या जंगलात रात्रीची सफर करीत असताना पर्यटकांना विविध प्रकारचे साप तसेच प्राणी आढळतात. त्यांचे योग्यप्रकारे संवर्धन होणे गरजेचे असते, तर सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वनौषधी वनस्पती आहेत. पूर्वीच्या काळी आंबोलीतून नरक्या या वनस्पतीची तस्करी होत असे. त्यानंतर त्याच्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळेच वनविभागाने वाढत्या पर्यटनामुळे येथील निसर्गाला कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर वनविभाग मलबार नेचर संस्था तसेच वनसंरक्षक समिती मिळून जंगल सफर करणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली तयार करणार आहेत. यामध्ये पर्यटकांनी धूम्रपान करून जंगलात जाऊ नये, सिगारेट, माचिस आदी वस्तंूना बंदी घालण्यात येणार आहे. तसेच एखाद्या प्राण्याचा फोटो काढत असताना किती अंतरावरून तो फोटो काढला जावा, आदींचा समावेश असणार आहे.त्याशिवाय आंबोलीत जंगल सफारीसाठी येणारे पर्यटक लक्षात घेऊन या जंगल सफारीसाठी तिकीट ठेवण्याचाही मानस वनविभागाचा आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक सह्याद्रीच्या पट्ट्यात वनाच्या संरक्षणासाठी नेमलेल्या समितीकडे हे अधिकार देण्याचा विचार आहे. यासाठी खास सफारीच्या एन्ट्रीलाच छोटीशी चौकी उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये वनसंरक्षक समितीचा एक सदस्य नेहमी ठेवला जाणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम आंबोली वनविभागाचे अधिकारी करीत आहेत. हा आराखडा मंजुरीसाठी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.प्राणी, वनस्पती यांचे संरक्षण झाले पाहिजे : गावकरयाबाबत वनविभागाचे आंबोलीतील वनक्षेत्रपाल संभाजी गावकर म्हणाले, वाढती जंगल सफर तसेच प्राणी आणि वनस्पती यांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवर संस्था व वनसंरक्षक समिती यांच्या मदतीने ही नियमावली तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रथम चर्चा करणार आहे.