शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराने थकवली परिवहनची रॉयल्टी

By admin | Updated: December 8, 2014 02:50 IST

ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका ठेकेदारावर केवळ नोटीसची कार्यवाही करीत आहे.

राजू काळे, भार्इंदरपालिकेने तीन वर्षांपूर्वी खासगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेल्या स्थानिक परिवहन सेवेची ठेकेदाराकडून पालिकेला मिळणारी ७१ लाख ८९ हजार ५८५ रु. लाखांची रॉयल्टी थकीत असल्याचे उजेडात आले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका ठेकेदारावर केवळ नोटीसची कार्यवाही करीत आहे. ठेकेदाराने मात्र पालिकेकडून आवश्यक सुविधाच मिळत नसल्याने तोटा होत आहे, त्यामुळे रॉयल्टी थकल्याचा दावा केला आहे. पालिकेने ९ आॅक्टोबर २०१० रोजी प्रति किलोमीटर १ रुपयाप्रमाणे रॉयल्टी देणारी पीपीपी तत्त्वावरील स्थानिक परिवहन सेवा सुरू केली. त्याचा ठेका उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रा. प्रा.लि. या कंपनीला देण्यात आला. बसखरेदीसाठी प्रशासनाने केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम (जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान) योजनेचा आधार घेतला आहे. एकूण १०२ बसची सेवा सुरू करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या बस राज्यातीलच एका स्थानिक प्रशासनाकडून नाकारण्यात आल्या होत्या असे गोपनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बस कंपनीकडून गॅरंटीच्या काळात बसची दुरुस्ती होणे अपेक्षित असताना एकदाही ती करण्यातआली नाही. तसा पाठपुरावा ठेकेदार व प्रशासनाकडूनच करण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या काळातच बस बिघडू लागल्या. सध्याच्या ५२ बसमधील सुमारे २० बस बिघडल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेकरिता ३२ बस रस्त्यावर धावत असून त्यात उल्हासनगर येथील ४ ते ६ बसचा आधार घेण्यात आला आहे. पालिकेकडून सुविधा मिळत नसल्यामुळेच शासकीय करासह प्रवासी कराचा भरणा व पालिकेला देय असलेली रॉयल्टी थकल्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. आॅक्टोबर २०११ ते सप्टेंबर २०१४ पर्यंत सुमारे ७८ लाख ८९ हजार ५८५ रु.पर्यंत रॉयल्टीची रक्कम थकीत आहे. त्यातील सुमारे सात लाख रु. आॅक्टोबर महिन्यात ठेकेदाराकडून भरण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित ७१ लाख ८९ हजार ५८५ रु. रॉयल्टी अद्याप थकीत असली तरी ती वसूल करण्यासाठी प्रशासन ठेकेदाराला केवळ नोटीस बजावून ठेकेदाराला रॉयल्टी भरण्याची आठवण करून देत आहे.