शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेची लाट कायम, दोन बळी

By admin | Updated: May 22, 2016 03:50 IST

विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला.

पुणे/मुंबई/नागपूर : विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला. तर खान्देशात २५० वटवाघुळांचा जीव गेला. मुंबईत ढगाळ वातावरण असले तरी जिवाची उलाघाल कायम आहे.राज्यात गेल्या चार दिवसांपासून आलेली अतिउष्णतेची लाट शनिवारीही कायम होती. मराठवाड्यासह कोकण आणि गोवाही तापला असून या तीनही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात दुपारची अघोषित संचारबंदी कायम असून जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. अकोला जिल्ह्यात शनिवारी दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यामुळे गत चार दिवसांत जिल्ह्यातील मृतांचा आकडा आठ झाला आहे. हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील शेतमजूर महिला अंजनाबाई महादेवराव बोंबटकार आणि उज्ज्वला महादेव चिकटे (४०) या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला. खान्देशातही सूर्य आग ओकत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत तापमान किंचित कमी झाले आहे. पाटालगत निंबाच्या झाडावर वटवाघुळे मृत्युमुखी पडल्याचे तर काही मरणासन्न अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. येत्या २४ तासांत कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : अमरावती ४५.६, वर्धा ४५.५, चंद्रपूर ४५, यवतमाळ व ब्रह्मपुरी ४४.५, नांदेड ४४, अकोला ४३.८, मालेगाव ४३.६, बीड ४३.२, गोंदिया ४२.६, औरंगाबाद ४१, अहमदनगर ४०.८, वाशिम व बुलडाणा ४०.६, सोलापूर ४०.१, नाशिक ३६.८, पुणे ३५.९, डहाणू ३५.७, सातारा ३५.६, मुंबई ३५.४ आणि रत्नागिरी ३४.४.