शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

स्थगितीपूर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवावे

By admin | Updated: June 9, 2016 06:03 IST

मराठा आरक्षणसंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकूमाला उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली.

मुंबई : मराठा आरक्षणसंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकूमाला उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. मात्र या स्थगितीपूर्वी ज्यांना या वटहुकूमांतर्गत करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी कार्यालयांतील नियुक्त्या कायम ठेवण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारच्या या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काढलेल्या वटहुकूमाला स्थगिती दिली. मात्र स्थगितीपूर्वी राज्य सरकारने वटहुकूमानुसार लगबगीने सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्त्या केल्या व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशही दिले होते. उच्च न्यायालयाने वटहुकूमाला स्थगिती दिल्याने लाभार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या वटहुकूमाला स्थगिती देण्यापूर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात सिव्हील अर्ज केला आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलेले आरक्षण काढू नये, अशीही विनंती सरकारने न्यायालयाला केली आहे. (प्रतिनिधी) ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावेसरकारी कार्यालयांत आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने २५ जून २०१४ रोजी घेतला. सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्य सरकार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.