शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाटणकर, सहारिया यांना अवमानना नोटीस

By admin | Updated: March 10, 2017 00:49 IST

एका प्रकरणात गुरुवारी नागपूर खंडपीठाने नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली आहे.

नागपूर : एका प्रकरणात गुरुवारी नागपूर खंडपीठाने नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर व राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना अवमानना नोटीस बजावली आहे.२०१५ मध्ये ब्रजभूषणसिंग बैस व वासुदेव चुटे यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायत क्षेत्राचा सालेकसा नगरपरिषद क्षेत्रात समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या वेळी सरकारी वकिलाने आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपरिषदेत समावेश करण्याचा निर्णय झाल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र शासनाने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात आमगाव खुर्दचा समावेश नाही. परिणामी बैस व चुटे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत निवडणूक स्थगित ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला. (प्रतिनिधी)