शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

संप मिटला, रुग्णांचे मात्र झाले हाल

By admin | Updated: July 4, 2015 03:36 IST

गुरुवारपासून मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये शुकशुकाट तर काही ठिकाणी रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र दिसले.

मनीषा म्हात्रे , मुंबईगुरुवारपासून मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये शुकशुकाट तर काही ठिकाणी रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र दिसले. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचाही वेग थंडावलेला होता. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने ६ महिन्यांच्या मोहम्मद साहेलचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. मध्यरात्री तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मात्र केईएम प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले. साहेल ४० टक्के भाजला असल्याने त्याला दाखल केल्यापासूनच त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सकाळी रुग्णालयांच्या चारही बाजूने पोलिसांचा फौजफाटा पाहावयास मिळाला. एरवी गजबज असलेल्या केईएम रुग्णालयात शुकशुकाट होता. डॉक्टरांच्या आंदोलनाची माहिती असलेल्या अनेकांनी रुग्णांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या आंदोलनाची माहिती नसलेले रुग्ण रुग्णालयाबाहेरील संपाच्या पाटीवरील डॉक्टरांच्या दिलगिरीचा फलक पाहून माघारी फिरले, तर काहींनी रुग्णालय प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त केला. या संपाचा सर्वात जास्त फटका मुंबईबाहेरून आलेल्या रुग्णांना बसला. गुरुवारी सुरु झालेले डॉक्टरांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरु राहिल्याने मुंबईतील प्रमुख रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग अर्धवट बंद स्थितीत होते. त्यामुळे नायर, केईएम आणि जेजे या रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे हाल झाले. याचा सर्वाधिक फटका नायर रुग्णालयातील रुग्णांना बसला. रुग्णवाहिकांनाही रुग्णालयांमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. दरम्यान, चिंताजनक प्रकृती असलेल्या पाच ते सहा रुग्णांवरच नायर रुग्णालयात उपचार झाले. केईएममध्ये रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रोशवेळीच उपचार न मिळाल्याने मृत पावलेल्या मोहम्मदच्या कुटुंबीयांनी केईएम रुग्णालयात गोंधळ घातला. मुलावर उपचार करा, अशी विनवणी करूनही केवळ संपामुळे माझ्या मुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. चिमुकल्याच्या मृत्यूने साहेल कुटुंबीय पूर्णत: कोलमडून गेले होते. ...अन् पुन्हा माघारीवसई येथील रहिवासी असलेले ५० वर्षीय राजेंद्र गुप्ता यांना लठ्ठपणाचा आजार आहे. अचानक श्वासोच्छ्वास घेण्यास त्यांना त्रास जाणवू लागला. पूर्वी केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना केईएम रुग्णालय गाठले. रुग्णालयाबाहेर एका स्टे्रचरवर त्यांना ठेवले. बराच वेळ ताटकळत राहिल्यानंतर डॉक्टरांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाल्याचे त्यांची पत्नी रुपाली गुप्ताने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अखेर निराश होऊन पुन्हा रुग्णवाहिकेच्या शोधासाठी त्यांच्या मुलाने शोधमोहीम सुरू केली. बराच वेळाने खाजगी रुग्णवाहिकेची सोय झाली आणि त्यांना पुन्हा माघारी नेण्यात आले. मार्ड आंदोलनाला फोर्डाचाही पाठिंबा मुंबईसह राज्यातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी वेतनवाढ, सुरक्षा व्यवस्था, रजा आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला दिल्लीच्या फोर्डा अर्थात फेडरेशन आॅफ रेसिडेंशल डॉक्टर असोसिएशननेही पाठिंबा दर्शवला होता.