शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार

By admin | Updated: April 11, 2015 00:07 IST

सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्णात शासकीय सैनिकी शाळा उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता द्यावी, असा एकमुखी ठराव

मुंबई : सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्णात शासकीय सैनिकी शाळा उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता द्यावी, असा एकमुखी ठराव आज विधानसभेने मंजूर केला. त्याचवेळी सातारा येथील शाळा अद्ययावत करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. तावडे यांनी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा ठराव मांडल्यानंतर त्यावर बोलताना जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, सुधीर गाडगीळ यांनी सातारा येथील शाळेच्या समस्या मांडल्या. या ठिकाणी तावडे यांनी भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अनिल गोटे यांनी धुळे वा नंदुरबार जिल्ह्णात अशी शाळा उभारण्याची मागणी केली. प्रत्येक महसूल विभागात अशी एक शाळा असावी, असे मत ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासगी सैनिकी शाळांना वारंवार विनंती करूनही सैन्यदलाकडून आवश्यक सामग्री मिळत नसल्याची तक्रार केली. सातारा येथील शाळेच्या समस्यांचा आढावा आपण आधीच घेतला आहे. त्या बाबत पुन्हा बैठक घेऊन समस्या सोडवू, असे तावडे यांनी सांगितले. त्या नंतर चंद्रपूरच्या शाळेचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला. (विशेष प्रतिनिधी)