शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ

By admin | Updated: April 5, 2015 00:48 IST

जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

जब्बार पटेल : डीएसके गप्पांमध्ये मांडली दिलखुलास मतेपुणे : देशातील सर्व धर्मग्रंथांपेक्षा राज्यघटना हाच सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. यामध्ये सर्व धर्मांतील नागरिकांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. जिथे मानवी हक्कांचा विचार होतो, तिथे भारतीय राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ ठरते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘डीएसके गप्पा’ कार्यक्रमात त्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. ‘मी उभा आहे’ या पहिल्या नाटकापासून ते अशी पाखरे येती, सामना, सिंहासन या अजरामर कलाकृतींच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटांबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. राजेश दामले व राज काझी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पटेल म्हणाले, की चरित्रपट निर्माण करताना एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती देणे एक आव्हान असते. डॉ. आंबेडकर हे तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशाला दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना सर्व घटकांतील नागरिकांना न्याय देणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट मांडणेही सोपे नव्हते.नाट्य व चित्रपटसृष्टीतील प्रवासाविषयी भरभरून बोलताना पटेल म्हणाले, की वयाच्या बाराव्या वर्षी आचार्य अत्रे यांच्या ‘मी उभा आहे’ या नाटकातून रंगभूमीवर प्रवेश केला. त्या वेळी पहिल्याच वाक्याला मिळालेल्या टाळ््यांनी रंगभूमीवर काम करण्यास प्रेरित केले. त्यानंतर कॉलेज जीवनात नाटके सुरूच राहिली. पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी आल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या सहवासामुळे नाट्य क्षेत्रात जणू मिसळून गेलो. माणूस नावाचं बेटं, घाशीराम कोतवाल, श्रीमंत, अशी पाखरे येती, खून पाहावा करून या नाटकांबरोबरच सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता हे चित्रपट आयुष्यातील माईलस्टोन ठरले. विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे आणि डॉ. लागू हे आपले दैवत असल्याचे पटेल यांनी सांगितले. १९७२ मध्ये सोडलेली अभिनयाची वाट पुन्हा धरणार नसल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)४‘अशी पाखरे येती’ या नाटकाचा हिंदी चित्रपट म्हणजे ‘मुसाफिर’. रेखा आणि नसरुद्दीन शहा यांच्यावर १९८६ मध्ये चित्रित झालेला हा चित्रपट निर्मात्यांमधील वाद, तसेच रीळ खराब झाल्याने पडद्यावर येऊ शकला नव्हता. मात्र, ही खराब झालेली रीळ पुन्हा पहिल्यासारखी किंबहुना अधिक चांगली करण्यात यश आली आहे. त्यामुळे लवकर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये येईल की नाही, हे स्पष्ट नसले तरी दूरचित्रवाणीवर पे्रक्षकांना हा चित्रपट पाहता येईल, असे जब्बार पटेल यांनी सांगितले.