शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरिंग मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा

By admin | Updated: March 2, 2015 02:39 IST

राज्यात खासगी, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना

मुंबई : राज्यात खासगी, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कासाठी वेठीस न धरता त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा संचालनालयाने दिला आहे.व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग या सामाजिक घटकांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क शासनाकडून देण्यात येते. शासनाने २००६-०७ या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचे धोरण मान्य केले आहे. यानुसार चालू शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीही शासनाकडून केली जाणार आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क भरले नाही, म्हणून परीक्षेला बसण्यास महाविद्यालये मनाई करीत असल्याच्या शेकडो तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेत संचालनालयाने हे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)