शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

‘त्यांना’ भूखंड देण्याचा विचार करा!

By admin | Updated: March 29, 2017 03:56 IST

गुन्हेगारीचा ठपका असलेल्या समाजाच्या पुनर्वसनासाठी सोलापूरमध्ये आरक्षित असलेला भूखंड मिळावा

मुंबई : गुन्हेगारीचा ठपका असलेल्या समाजाच्या पुनर्वसनासाठी सोलापूरमध्ये आरक्षित असलेला भूखंड मिळावा, यासाठी संबंधित समाजाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश उच्च न्यायालयाने सामाजिक कल्याण मंत्रालयाला दिले; तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी व सुधारणेसाठी त्यांना भूखंड देण्याचा विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले.स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी सोलापूर येथे नियोजित विमुक्त जाती (माजी गुन्हेगार जमाती) सहकारी गृहनिर्माण संस्थेला ६० ते ७० एकर भूखंड त्यांच्या सोसायटीसाठी दिला होता. गुन्हेगारीचा ठपका असलेल्या समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांच्या सुधारणेसाठी संबंधित भूखंड संस्थेच्या ताब्यात देण्याचे निर्देश सामाजिक कल्याण मंत्रालयाला देण्यात यावेत, यासाठी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर आणि प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकाकर्त्यांचे वकील अशोक ताजणे यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ४०० ते ५०० लोक या संस्थेचे सदस्य आहेत. ब्रिटिश काळात ‘क्रिमिनल ट्राईब अ‍ॅक्ट’ मंजूर केला. संबंधित जमातीतील लोकांचा समाजातील वावर कमी करून त्यांना सुधारण्याची संधी मिळावी, या हेतूने हा कायदा मंजूर करण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या समाजाला भूखंड राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर संबंधित कायदा रद्द करण्यात आला असला तरी आरक्षण तसेच ठेवले आहे. पारधी, ठाकरी, राजपूत भामटा आणि छप्पर बांध या समाजाचा यामध्ये समावेश आहे. सोलापूरमधील भूखंड मिळावा, यासाठी या संस्थेने राज्य सरकारकडे निवदेन केले. मात्र सरकार काहीच करत नसल्याने त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे ताजणे यांनी सांगितले. राज्य सरकारने केवळ भूखंड देऊ नये, तर रस्ते, पाणी, शाळा आदी सुविधाही पुरवाव्यात, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)