शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसचे नाराजवीर प्रदेशाध्यक्षांना भेटणार

By admin | Updated: February 4, 2017 22:07 IST

प्रदेशाला अंंधारात ठेवून मनसेशी छुपी आघाडी

नाशिक : कॉँग्रेस शहराध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसला अंधारात ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत दोन प्रभागांत छुपी आघाडी केल्याचा आरोप करीत यावर पक्षाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी कॉँग्रेसच्या एका गटाने केली.टिळकपथ येथे झालेल्या एका खासगी सहकारी पतसंस्थेत कॉँग्रेसच्या नाराज गटाची बैठक झाली. बैठकीत शहराध्यक्ष शरद अहेर व माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. यावेळी बोलताना वसंत ठाकूर यांनी सांगितले की, प्रभाग तेरामधून आपल्या पत्नीसाठी कॉँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म येऊनही तो त्यांना न देता या प्रभागातून मनसेशी छुपी युती करीत मनसेला चाल देण्यात आल्याचा आरोप वसंत ठाकूर यांनी शनिवारी (दि.४) सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे दूरध्वनीवर केला. ठाकूर यांना खासदार अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात लेखी तक्रार करण्याची सूचना केली आहे. राजेंद्र बागुल यांनी सांगितले की, पक्षातील निष्ठावंतांचा हा आक्रोश आहे. प्रदेश कॉँग्रेसला अंधारात ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी छुपी युती प्रभाग १३ व प्रभाग ५ मध्ये करण्यात आली आहे. शिवसेना व भाजपाला चाल देण्यासाठीच जाणूनबुजून कॉँग्रेसचे उमेदवार दिले नसल्याचा आरोप राजेंद्र बागुल यांनी केला. पांडुरंग बोडके यांनी प्रभाग पाचमधून आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना ज्या नरेश पाटील यांच्या मातोश्रींना उमेदवारी दिली ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून, पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप केला. शरद अहेर व डॉ. शोभा बच्छाव यांच्यावरच बैठकीत पदाधिकाऱ्यांनी टिकास्त्र सोडले. येत्या गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बोलविले आहे. बैठकीस सुरेश मारू, पांडुरंग बोडके, अनिल कोठुळे, रामप्रसाद कातकाडे, बाळासाहेब वाघमारे, भगवान अहेर, नदीम शेख, प्रवीण अहेर, अण्णा मोरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.