पनवेल : दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी २ नोव्हेंबरला आत्महत्याग्रस्त माजी सैनिकाच्या परिवाराला भेट देण्यासाठी दवाखान्यात गेले असताना केंद्र सरकारच्या दबावाखाली दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवून त्या मृत सैनिकाच्या परिवाराला भेटू न देता ताब्यात घेतले. अशा प्रकारे सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध म्हणून पनवेल काँग्रेसने शिवाजी चौक पनवेल येथे निदर्शने करण्यात आली. तसेच मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, शहर अध्यक्ष अॅड. के. एस. पाटील, जिल्हा सरचिटणीस शशिकांत बांदोडकर, शहर चिटणीस विक्र म रामधरणे, प्रदेश महिला सरचिटणीस व नगरसेविका निर्मला म्हात्रे, तालुका कार्याध्यक्ष अभिजित पाटील, नगरसेवक लतीफ शेख, सुनील खंडागळे, ताहीर पटेल, जव्वाद पटेल आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
पनवेलमध्ये काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:25 IST