शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार सरकारची कोंडी

By admin | Updated: November 24, 2014 01:22 IST

राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही, या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात

शेतकऱ्यांना पॅकेज द्या : अन्यथा राज्यभर आंदोलन नागपूर : राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही, या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात राज्यातील भाजप सरकारची कोंडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. पराभवाची कारणमिमांसा करण्यासोबतच सरकारदरबारी राज्यातील जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने पॅकेज जाहीर करावे. त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. राज्यात दुष्काळ असताना गत तीन वर्षांत शेतकऱ्यांना काँग्रेस सरकारने १० हजार कोटींची मदत केल्याची आठवणही त्यांनी भाजप सरकारला यावेळी करून दिली. राज्यात शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाची प्रमुख जबाबदारी माजी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तर संयोजक पद आ.विजय वडेट्टीवार यांच्याकडे राहील. यासोबतच काँग्रेसचे सर्व आजी-माजी खासदार, आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष या आंदोलनात सहभागी होतील. माजी मंत्री नितीन राऊत, आ.राजेंद्र मुळक, माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अनिस अहमद, आ.अमर काळे, आ. राहुल बोंद्रे, आ.वीरेंद्र जगताप, अ‍ॅड.अभिजित वंजारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, सरचिटणीस अतुल कोटेचा यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)