शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार सरकारची कोंडी

By admin | Updated: November 24, 2014 03:07 IST

राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे.

नागपूर : राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही, या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात राज्यातील भाजपा सरकारची कोंडी करण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्यासोबतच सरकारदरबारी राज्यातील जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने पॅकेज जाहीर करावे. त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. राज्यात दुष्काळ असताना गत तीन वर्षांत शेतकऱ्यांना काँग्रेस सरकारने १० हजार कोटींची मदत केल्याची आठवणही त्यांनी भाजपा सरकारला यावेळी करून दिली. राज्यात शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाची प्रमुख जबाबदारी माजी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तर संयोजक पद आ. विजय वडेट्टीवार यांच्याकडे राहील. यासोबतच काँग्रेसचे सर्व आजी-माजी खासदार, आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष या आंदोलनात सहभागी होतील.