शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस गेली आयसीयूमध्ये!

By admin | Updated: May 17, 2014 04:41 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शेतकर्‍यांना वीजदरात सवलत दिली, मुंबईतल्या झोपडपट्यांंना संरक्षण देण्यासाठी कायदा केला,

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने शेतकर्‍यांना वीजदरात सवलत दिली, मुंबईतल्या झोपडपट्यांंना संरक्षण देण्यासाठी कायदा केला, अनधिकृत घरांच्या बाबतीत निर्णय घेतले, मात्र यातली एकही बाब काँग्रेसच्या मदतीला आली नाही. देशाला १७ खासदार देणार्‍या काँग्रेसच्या वाट्याला या निवडणुकीत अवघे दोन खासदार आले, एवढा दारुण पराभव काँग्रेसचा या आधीही कधी झाला नव्हता. गुजरातपेक्षा महाराष्टÑ अनेक गोष्टींवर आघाडीवर असताना, राज्यात आजपर्यंत झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे मिळालेले यश, प्रामाणिक मुख्यमंत्री अशी प्रतिमा, मुंबईत पायाभूत सोयीसुविधांचे उभे केलेले जाळे, भ्रष्टाचारात लिप्त असणारे मंत्री राष्टÑवादीचे आहेत, काँग्रेसचा त्याच्याशी संबंध नाही असे चित्र निर्माण करण्यात आलेले यश, एवढ्या जमेच्या बाजू असताना देखील काँग्रेसचा न भूतो न भविष्यती असा पराभव राज्यात का झाला? या प्रश्नाने प्रत्येक काँग्रेस नेत्याला भंडावून सोडलेले आहे. दुसर्‍याकडे असे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटे येतात याचा मात्र याच नेत्यांना सोयीस्कर विसर पडला. साध्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नेमणुका देखील केल्या नाहीत, विविध महामंडळांवर पदाधिकारी नाहीत, इथपासून ते कार्यकर्त्यांची छोटी छोटी कामे होईनाशी झाली. मुख्यमंत्र्यांकडे फायली पडून असतात, वेळेवर निर्णय होत नाहीत, या सातत्याने होणार्‍या आरोपाचे खंडन करता आले नाही.