शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अखंड महाराष्ट्रवादीच!

By admin | Updated: August 28, 2016 01:29 IST

विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे काहीही म्हणत असले तरी काँग्रेस अखंड महाराष्ट्रवादीच आहे. या विषयावर लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया

पुणे : विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे काहीही म्हणत असले तरी काँग्रेस अखंड महाराष्ट्रवादीच आहे. या विषयावर लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे आमदार नारायण राणे यांनी सांगितले. ‘तुम्ही लढा, मी कपडे सांभाळतो’ असे करणाऱ्यांनी न्यायालयाशी भांडण्याऐवजी सरकारबरोबर भांडावे, अशी टीकाही त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.स्वतंत्र विदर्भाबाबत काँग्रेसची भूमिका अद्याप ठरलेली नाही, असे वक्तव्य करणाऱ्या माणिकराव ठाकरे यांनी आपण अखंड महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती आहोत हे लक्षात ठेवावे, असे राणे म्हणाले. गोहत्याबंदी कायदा काँग्रेसने आणला नाही. युती सरकारमध्ये मी पशुसंवर्धनमंत्री असताना गोहत्याबंदी कायद्याचा प्रस्ताव आला होता, पण मला हा कायदा मान्य नाही, असेही राणे म्हणाले.असहिष्णुता, जातीयवाद व धर्मवाद या तिन्ही गोष्टी राज्य व केंद्र सरकारमध्ये आहेत. त्यामुळेच दलित, अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, असा आरोपही राणे यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)