शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

By admin | Updated: January 12, 2016 04:33 IST

राज्यातील १७ नगरपंचायत निवडणुकींमध्ये २८९पैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून, त्याखालोखाल ७८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.

मुंबई - राज्यातील १७ नगरपंचायत निवडणुकींमध्ये २८९पैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून, त्याखालोखाल ७८ जागा जिंकलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचा पुरता धुव्वा उडाला. सेनेला ५७ तर भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावे लागले.राज्यात १७ नगरपंचायती व दोन नगरपालिकांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत घवघवीत यश मिळवले. १७पैकी नायगाव व हिमायतनगर (नांदेड), उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदुरबार जिल्ह्यातील आक्राणी, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व कोरपना या ७ नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व शेवगाव, रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि म्हसळा अशा चार नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बुहमत पटकावले. चार नगरपालिकांसह एकूण ७८ जागा जिंकून जोरदार मुंसडी मारली आहे. यामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जामखेड नगरपालिकेत भाजपाचा दारुण पराभव झाला. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड व अहमदनगर महानगरपालिकेच्या तसेच निलंगा व हिंगणघाट नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला रायगड जिल्ह्यातील तळा आणि पोलादपूर नगरपालिकेत बहुमत मिळाले.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्णातील गोंडपिंपरी, जिवनी व कोरपना या तीन नगर पंचायतीत भाजपाचा दारुण पराभव झाला. कोरपना येथील एकही जागा भाजपाला जिंकता आलेली नाही.पुरस्कृत अपक्षही विजयीराज्य निवडणूक आयोगाकडील अधिकृत आकडेवारीनुसार, काँग्रेस १०४ तर राष्ट्रवादीला ७८ जागा मिळाल्या आहेत. मात्र ही आकडेवारी चिन्हावर लढलेल्या उमेदवारांची असून, काही ठिकाणी पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार निवडून आल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे.चेंबूरची जागा शिवसेनेकडेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे समर्थक अनिल पाटणकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे झालेल्या महापालिकेच्या चेंबूर-घाटला प्रभागात पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पाटणकर विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र नगराळे यांचा पराभव केला.