शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे उद्यापासून ‘पर्दाफाश आंदोलन’

By admin | Updated: August 21, 2015 00:52 IST

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा पर्दाफाश करणारे आंदोलन काँग्रेसतर्फे येत्या शनिवारपासून राज्यभर सुरू करणार असल्याची घोषणा काँग्रेस

कोल्हापूर : केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा पर्दाफाश करणारे आंदोलन काँग्रेसतर्फे येत्या शनिवारपासून राज्यभर सुरू करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली. या आंदोलनातून भाजपाचा दुटप्पीपणा उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथे राजीव गांधी सद्भावना दौडच्यानिमित्ताने आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते आले होते. सायंकाळी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभर दुष्काळाचे गडद सावट असताना त्याबद्दल कोणत्याच उपाययोजना न करता हाताची घडी घालून बसलेल्या सरकारवर त्यांनी टीकेची तोफ डागली.मंगळवारपर्यंत करण्यात येणाऱ्या या आंदोलनात आम्ही मेळावे, सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रसारमाध्यमांशी संवाद या माध्यमातून भाजपाच्या धोरणांचा पर्दाफाश करू. संसदेचे अधिवेशन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चालवू दिले नाही म्हणून भाजपाने प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात आंदोलन सुरू केले आहे. त्यास प्रत्युत्तर देण्याचे काम काँग्रेस करेल, असे ते म्हणाले.मुदतपूर्व निवडणुकांची शक्यताकेंद्र आणि राज्यातील सरकार ज्याप्रमाणे हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेत आहे, त्याचा विचार केल्यास मुदतपूर्व निवडणुका लागणार असल्याचे भाकीत अशोक चव्हाण यांनी केले. दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. (प्रतिनिधी)