शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: December 9, 2014 02:26 IST

कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने या मुद्यावर विधान परिषदेत आक्रमक धोरण अवलंबिले.

नागपूर : कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने या मुद्यावर विधान परिषदेत आक्रमक धोरण अवलंबिले. संतप्त सदस्यांनी सभागृहात सरकार विरोधात घोषणा दिल्या. महसूलमंत्री एकनाथ खडसे व काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.
सकाळी 11 वाजता पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राजेंद्र मुळक, संजय दत्त यांच्यासह इतरही सदस्यांनी सभागृहाचे सर्व कामकाज थांबवून शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घेण्याची मागणी  केली. राज्यात दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र सरकार त्यांच्या मदतीसाठी कोणतेही पाऊल उचलत नाही. पॅकेज जाहीर करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
यासंदर्भात निवेदन करताना सभापती  म्हणाले की,  कामकाज पत्रिकेवर शोकप्रस्ताव आहे. राष्ट्रवादीनेही या प्रश्नावर औचित्याच्या मुद्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे सभागृहाचे मत घेतल्यावरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
ठाकरे यांनी स्थगन दिल्याने त्यांना त्यावर मत मांडण्यास सभापतींनी परवानगी दिली. पण शेकापचे जयंत पाटील यांनी त्यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहाचा पहिला दिवस असल्याने मंत्र्यांचा परिचय, शोक प्रस्ताव हे कामकाज पत्रिकेवरील विषय झाल्यावर शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्यावी, शोक प्रस्ताव बाजूला ठेवून चर्चेला परवानगी दिल्यास चुकीचे संकेत निर्माण होतील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनीही याला दुजोरा दिला. मात्र काँग्रेसचे सदस्य चर्चेच्या मुद्यावर आग्रही होते. शोक प्रस्तावावरच चर्चा करायची असेल तर प्रथम शेतक:यांच्या आत्महत्येचाही शोक प्रस्ताव आणा, असे काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले. 
सरकारची बाजू मांडताना एकनाथ खडसे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज हे नियमानुसारच चालायला हवे, त्यामुळे कामकाज पत्रिकेवर जे विषय आहे त्यानुसार पुढचे कामकाज घ्यावे,
यावर काँग्रेसचे सदस्य संतापले ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’ अशा सरकारचा निषेध करणा:या घोषणा त्यांनी दिल्या. सभागृहात एकच गदारोळ झाला. सर्व  सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर सभापतींनी नियम 2क्7 नुसार चर्चा करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर अध्र्या तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळला 
 संकटग्रस्त शेतक:यांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेसने नियम 57 अंतर्गत मांडलेला प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार मंत्र्यांचा परिचय व शोकप्रस्ताव घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील वारंवार मागणी करीत राहिले पण अध्यक्षांनी त्यांची दखल घेतली नाही.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, दीड महिन्यात दोन हजार आत्महत्या झाल्या. अधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी रविवारी तब्बल 57 शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत. कापसाला भाव मिळालेला नाही. सोयीबीन हातून गेले आहे. संकटात सापडलेल्या शेतक:याला सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी त्यांनी केली. विखे पाटील मागणी करीत असतानाच अध्यक्षांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांचा परिचय करून देऊ लागले. 
 
शेतक:यांच्या प्रश्नावर काँग्रेसने दिलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारायचा किंवा नाही याबाबत सभागृहात चर्चा सुरू असताना महसूलमंत्री एकनाथ खडसे व विरोधी बाकावरील काँग्रेस सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. शेतक:यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर आहे, यावर चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र काँग्रेसने दिलेला प्रस्ताव हा नियम 289 मध्ये बसणारा नाही, असे खडसे म्हणताच काँग्रेसचे सदस्य संतापले व त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे खडसे संतापले. 
 
तालिका अध्यक्ष जाहीर
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तालिका अध्यक्ष म्हणून शिवाजीराव नाईक, योगेश सागर, विजय अवटे, वर्षा गायकवाड, दिलीप सोपल यांच्या नावांची घोषणा केली.