शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीपट्टी पुनर्वसनाचा संभ्रम

By admin | Updated: January 17, 2015 05:49 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रामध्ये असलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली वन विभागाने सुरू केल्या आहेत.

घोडबंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रामध्ये असलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली वन विभागाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी २००० साली ज्या झोपडीधारकांनी पुनर्वसनाचे पैसे भरले आहेत, त्यांचीच यादी तयार करण्याचे काम सुरू केल्याने रहिवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देणारा शासनाचा आदेश वनजमिनीवरील घरांना लागू नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. २००८ साली हरित वसई या संस्थेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राधिकरणांना त्यांच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वनखाते वगळता सर्व प्राधिकरणांनी सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयासमोर ठेवला होता. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एमआयडीसीने सर्व्हे केलेल्या झोपड्यांवर आता वनखाते दावा सांगत आहे. १९९७च्या निर्णयानुसार संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश असताना ते आतापर्यंत झालेले नाही. वनजमिनीवर झोपड्या नसल्याचे कारण देत येथील रहिवाशांनी पुनर्वसनास नकार दिला होता. तेव्हा झालेल्या सर्वेक्षणानंतर वनजमिनीचा पुन्हा सर्वेच झालेला नाही. त्यावेळी अनेक रहिवाशांनी या सर्वेक्षणाला विरोध केल्यामुळे व हद्दीचा वाद असल्यामुळे पुनर्वसनाचे पैसे भरता आलेले नसल्याने त्यांचा हक्कच सरकारने हिरावण्याचे संकेत दिले आहेत. वारलीपाडा, कैलासनगर, जुनागाव, रामनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, कोकणीपाडा ते गायमुख हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याचा दावा वनखाते करीत आहे. या जागेवर सुमारे ७ हजार झोपड्या वसल्या आहेत. न्यायालयाने सीमेची हद्द निश्चित करण्याचे आदेश तर दिले़ परंतु, आजतागायत एकही सरकारी अधिकारी या विभागात फिरकलाच नसताना केवळ कार्यालयात बसून हद्द निश्चित केल्या असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. यातील सर्व्हे नंबर ५१९ व ५२० हे वनजमिनीतून वगळल्याचे प्रकरण शासनस्तरावर प्रलंबित आहे. (प्र्रतिनिधी)