शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणावरून विरोधकांचा गदारोळ

By admin | Updated: July 21, 2015 01:21 IST

सत्ता आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन भाजपाने निवडणूक काळात दिले होते, पण खुर्चीवर येऊन आता नऊ महिने झाले तरी धनगर आरक्षणाचा

मुंबई : सत्ता आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन भाजपाने निवडणूक काळात दिले होते, पण खुर्चीवर येऊन आता नऊ महिने झाले तरी धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. समाजाची केवळ दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधान परिषदेत जोरदार गदारोळ केला. काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आरक्षणाची प्रक्रिया स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावर विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. यापूर्वीच्या हिवाळी अधिवेशनात आणि वाहिन्यांवरील मुलाखतीदरम्यान स्वत: विष्णू सवरा यांनी धनगर आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितल्याने त्यांनी उत्तर देऊ नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. मात्र, सभागृहाबाहेरील वक्तव्य व्यक्तिगत असते. सभागृहात त्यांना शासन म्हणून बोलू देण्याची सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. कोणत्याही जातीला आदिवासी ठरविण्याची निश्चित पद्धत आहे. राजकीय हेतूने अथवा मागणी केली म्हणून आरक्षण देता येत नाही, अशी भूमिका मंत्री सवरा यांनी मांडली. आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा अनुकूल अहवाल आल्यानंतर मुख्य सचिव व आदिवासी विकासमंत्र्यांच्या समितीपुढे आरक्षणाचा मुद्दा येतो. त्यानंतर अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेपुढे ठरावाच्या रूपाने आरक्षणाचा प्रस्ताव आणता येतो, अशी माहिती सवरा यांनी दिली. मात्र, आरक्षणाची पद्धती सभागृहाला माहीत आहे. मुळात अनुसूचित जमातींच्या यादीत धनगड समाजाचा समावेश करण्यात आला आहे. धनगडचेच इंग्रजीत धनगर असे भाषांतर होते. त्यामुळे राज्य सरकारला केवळ तशी शिफारस करण्याची आवश्यकता आहे. ती प्रक्रिया कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.