शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

निलंगेकरांच्या चौकशीवरून गोंधळ

By admin | Updated: July 29, 2016 03:39 IST

कर्जाच्या फसवणूक एका प्रकरणात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी

मुंबई : कर्जाच्या फसवणूक एका प्रकरणात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, या मागणीसाठी विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत जोरदार हंगामा केला. कॉँग्रेस व राष्ट्रावादीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, परिणामी कामकाज दोनवेळा तहकुब करावे लागले.विरोधक आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील कोणीही मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला तर त्यांना पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही देऊन या विषयावरील गोंधळास पूर्णविराम दिला.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी या विषयाला हात घातला. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे या आयुधाचा वापर करीत विखे पाटील यांनी संभाजी पाटील यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे काही पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. विखेपाटील विस्ताराने हे प्रकरण सांगत माझ्याकडे काही नवीन पुरावे असल्याचे असताना गिरीष बापट यांनी त्यास आक्षेप घेतला. मागच्या आठवड्यात या विषयावर चर्चा झाली असल्याने नेमके मुद्दे मांडावेत, अशी सूचना केली. एवढेच नाही तर त्याच त्या विषयावर बोलणार असाल तर ते आम्ही आम्ही ऐकून घेणार नाही, असे बापट म्हणताच वादाची ठिणगी पडली. जयंत पाटील यांनी संसदीय कार्य मंत्र्यांना ही भाषा शोभत नाही, अशा शब्दांत बापट यांना सुनावले, त्याचवेळी सभागृहात गोंधळ सुरु झाला. विरोधक वेलमध्ये आले, घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे अध्यक्षांनी पहिल्यांदा पंधरा मिनिटासाठी सभागृह तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरु झाले तेव्हाही ‘भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या’ अशा घोषणा देत, सभागृहातील गोंधळ सुरुच ठेवला. त्यामुळे पुन्हा दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब ठेवले गेले. पुन्हा कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री सभागृहात आले. तालिका अध्यक्षांनी विखेपाटीलांना बोलण्यास परवानगी दिली. (प्रतिनिधी)कमिशनर इन्क्वायरी अ‍ॅक्टखाली चौकशी करावी- व्हिक्टोरिया फुड प्रोसेसिंग लि. या कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या फसवणूक प्रकरणात निलंगेकर यांचे नाव आहे. बॅँकेला एक जमीन बदलून दुसरीच मिळकत दिली आहे. या प्रकरणी सरकारने कमिशनर इन्क्वायरी अ‍ॅक्टखाली चौकशी करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.- कोणाच्याही मनात शंका राहू नये म्हणून यासंबंधातील कागदपत्रांची तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, एवढेच नाही तर भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात मंत्र्यांचे नाव आल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.