शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या प्रस्तावात परस्पर काटछाट

By admin | Updated: December 18, 2015 02:43 IST

विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या २९३ च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसे काम करायचे

नागपूर : विधानसभेत विरोधी पक्षाने दिलेल्या २९३ च्या प्रस्तावात विरोधकांना अंधारात ठेवून बदल केले गेले. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी कसे काम करायचे हे देखील आता सरकार ठरवणार आहे का? असा सवाल विरोधकांनी केला मात्र त्यात म्हणावी तशी तीव्रता नव्हती. त्यातून सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला खरा, पण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.गुरुवारचा दिवस विरोधकांचा असतो. त्यादिवशी विरोधक त्यांना हवा तो प्रस्ताव मांडतात. त्यानुसार राधाकृष्ण विखे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम या बड्या नेत्यांनी एकत्रितपणे विदर्भ व मराठवाड्यातील सिंचनाचा वाढता अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचन प्रकल्पांना मान्यता न मिळणे असा विषय चर्चेला आणला होता. त्यासोबतच गोसीखुर्द. बेंबळा, लोअर वर्धा, अप्पर वर्धासारखे प्रकल्प अद्याप पूर्ण झाले नसल्याचा विषयही चर्चेला दिला होता. मात्र सकाळी कामकाज पत्रिका पाहून विरोधकांना धक्काच बसला. आपण दिलेल्या प्रस्तावात काटछाट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणाला विचारून हे केले गेले याची शहानिशा झाली; पण कोणालाच विचारले गेले नाही हे लक्षात येताच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय थेट सभागृहात काढला. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे देखील यावर संतप्त झाले. आम्हाला न सांगता परस्पर विरोधकांच्या प्रस्तावात अशी काटछाट होते कशी?, असे होत असेल तर या कामकाजाला अर्थ तरी काय उरला असा थेट सवाल अजित पवार यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केला. तर विरोधकांनी काय बोलायचे आणि काय नाही हे सरकार ठरवणार आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अध्यक्ष बागडे यांनी, तीन-चार विभागांचा समावेश असल्याने काही विभाग व चर्चेत येऊन गेलेले विषय वगळले असतील. विरोधकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असेल, पण तो झाला नसेल. पण तुम्ही तुमच्या विषयावर बोला असे सांगूून चर्चा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला.शेवटी शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी जे विषय वगळले आहेत त्यातले कोणते घ्यायचे आणि कोणते नाही, यासाठी अध्यक्षांच्या दालनात बैठक घ्या आणि ठरवा असे सांगून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा प्रस्ताव कापला कोणी याचे उत्तर शेवटपर्यंत विरोधकांना मिळाले नाही, त्यांनीही ते जाणून घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. ( विशेष प्रतिनिधी)