शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

‘उच्च रक्तदाबा’चा ग्रामीण भागांना विळखा

By admin | Updated: May 17, 2016 03:01 IST

पुणे-शुद्ध व खेळती हवा, निसर्गसंपन्न परिसर ही गावाकडची ओळख.

नम्रता फडणीस,

पुणे-शुद्ध व खेळती हवा, निसर्गसंपन्न परिसर ही गावाकडची ओळख. मात्र या भागांमध्येही आता शहरीकरण झपाट्याने सुरू झाल्याने ही ओळख काहीशी पुसली गेली आहे. बदलती जीवनशैली, फास्टफूडचे सेवन या कारणांमुळे आता ग्रामीण भागातील लोकांनाही उच्च रक्तदाबाचा विळखा पडू लागला असल्याची बाब एका पाहणीद्वारे समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण अधिक असून, बहुतांश व्यक्ती आपल्याला ‘रक्तदाबा’चा त्रास आहे, याबाबतच अनभिज्ञ आहेत! सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लरी स्कूल आॅफ हेल्थ सायन्सेस’ विभागामध्ये एमएस्सी करणाऱ्या सोफिया अहमद आणि डॉ. अमित मेश्राम या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील कामशेतजवळील पाथरगाव, नाणेगाव, नायगाव, चिखलसे आणि कुसगाव या पाच गावांमध्ये सायलंट किलर समजल्या जाणाऱ्या ‘रक्तदाब’ या विकाराबाबत पाहणी केली. त्यासंदर्भात ‘अ स्टडी टू डिटरमाईन आॅफ रेजड ब्लड प्रेशर अँड असोसिएटेड रिस्क फॅक्टर्स इन अ रूरल एरिया आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट’ या विषयावर नुकताच संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे. यासाठी केईम रिसर्च संशोधन विभागाचे डॉ. सुदिप्तो रॉय यांचे मार्गदर्शन लाभले. या पाहणीविषयी सांगताना सोफिया अहमद ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली, की कामशेतजवळ ३८ गावं आहेत, त्यातील पाच गावांची निवड आम्ही केली, त्यानुसार त्यातील २२६ व्यक्तींची (स्त्री व पुरुष) वैयक्तिक आरोग्य तपासणी करण्याबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार डाएट, मास इंडेक्स, व्यसन, उंची, वजन, शारीरिक हालचाली यांबाबत एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. यामधून समोर आलेल्या निष्कर्षानुसार ६६ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसले, म्हणजे या भागात रक्तदाबाचे प्रमाण हे २९.२ टक्के इतके आहे. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ४९.२ टक्के तर महिलांचे प्रमाण हे २१.२ टक्के आहे.