शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जंतनाशकाने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

By admin | Updated: February 11, 2016 01:42 IST

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाटलेल्या गोळ्या घेताच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शाळेतील ७० विद्यार्थ्यांची

मोर्शी/पोफाळी : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाटलेल्या गोळ्या घेताच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शाळेतील ७० विद्यार्थ्यांची आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील जिल्हा परिषद शाळेतील आठ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. यामुळे पालकवर्ग चांगलाच धास्तावला आहे. शासनाने जंतनाशक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये सरकारी दवाखान्यांमार्फत ‘अलबेन्डाझोल’ गोळ्यांचे वाटप केले होते. मोर्शीतील शिवाजी कन्या शाळेत दुपारच्या सत्रात मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांना जेवणानंतर गोळ्या दिल्या. त्यानंतर लगेच त्या विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. उलट्या होऊ लागल्या. विद्यार्थ्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. शेकडो लोकांनी दवाखान्यात गर्दी केली होती. नगर परिषदेच्या एका शिक्षकालासुद्धा ही गोळी घेतल्यानंतर अत्यवस्थ वाटू लागले. प्रत्येक शाळेत ही गोळी विद्यार्थ्यांना चावून खाण्यास सांगितले. परंतु १५ वर्षे वयोगटाच्या आतील मुलांना ही गोळी पचली नसावी, असा अंदाज या घटनेत व्यक्त होत आहे. या प्रकरणाची पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गंभीर दखल घेतली असून वस्तुस्थितिदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)