शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मंंदोशी घाटात कठड्यांचे काम पूर्ण

By admin | Updated: July 10, 2017 01:51 IST

मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : मंदोंशी घाटातील कठडे तुटल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. याच कारणाने येथील पंढरपूर-पुणे-भीमाशंकर ही एसटी बस बंद करावी लागली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या घाटातील धोकादायक वळणावर कठडे बांधण्यात आले असून, हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.पुणे, चाकणमार्गे येणाऱ्या प्रवाशांना भीमाशंकरला जाण्यासाठी मंचरमार्गाने २५ ते ३० कि.मी. जास्तीचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास राजगुरुनगरवरुन वाडा-डेहणे या मधल्या मार्गाने केल्यास २५-३० कि.मी.चा प्रवास व वेळ वाचतो. शिवाय या मार्गावरील ४० कि.मी.चा चासकमान धरणाशेजारून जाणारा रस्ता पर्यटकांना आकर्षित करतो. पुढे भोरगड व अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर म्हणजे पर्वणीच. त्यामुळे पर्यटक या मार्गाचा अवलंब करत असतात. मात्र, मंदोशी घाटातील धोकादायक वळणावर कठडे नसल्यामुळे मधल्या काळात पंढरपूर-पुणे -भीमाशंकर ही एसटी बस बंद करण्यात आली. ही बस आर्थिक फायद्याची ही ठरली परंतु सुरक्षिततेचे कारण देत बंद करण्यात आली. या नंतर या घाटाच्या दुरुस्तीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली होती. घाटातील अनेक धोकादायक वळणांवर कठडे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. पुणे विभागीय अधिकारी यांना २०१५मध्ये भीमाशंकर -राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता, त्यानंतर वाहतूक नियंत्रक, पुणे यांनी फेब्रुवारी २०१५ ला या नवीन फेरीस रीतसर मंजुरी दिली. परंतु या रस्त्याचे सर्वेक्षण केल्यावर मंदोशी घाटातील दुसऱ्या वळणावर कठडा बांधणे आवश्यक असल्याचा अहवाल दिल्याने बस सुरू होऊ शकली नाही. परंतु आता या सर्व त्रुटी पूर्ण झाल्यामुळे व घाटरस्ता पूर्ण सुरक्षित असल्याने श्रावण महिना सुरू होण्याआधी ही एसटी बस सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाकडे प्रवाशांच्या वतीने मागणी केली आहे.’’- अ‍ॅड. सुरेश कौदरे, सहकार्यकारी विश्वस्त, श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान.भीमाशंकरला जाणारा जवळचा मार्गभीमाशंकर येथे जाण्यासाठी राजगुरुनगरवरुन एकही एसटी बस नसल्यामुळे भीमाशंकरला चाकण, पुणे मार्गे येणाऱ्या भाविकांना मंचर मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नाहक वेळ व पैसा खर्च होत आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची भोरगिरी, कोटेश्वरच्या निसर्गरम्य परिसराला पसंती असल्याने त्यांना या मार्गाने जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी पाहता या मार्गे भीमाशंकर-राजगुरुनगर एसटी बस सुरू करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.पावसाळ्यात येणारे पर्यटक व पुढे श्रावण महिन्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी भीमाशंकर- -राजगुरुनगर एसटी बस सुरू होणे आवश्यक आहे.अनेक वेळा तोंडी मागणी केली जाते परंतु एसटीचे अधिकारी दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे ‘लोकमत’च्या माध्यमातून अनेक भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी ही बस त्वरित चालू करण्याची मागणी केली आहे.