शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावरील महादरवाजाचे काम पूर्ण

By admin | Updated: December 28, 2016 01:41 IST

हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवकालीन जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगड प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादरवाजाचे काम भारतीय पुरातत्त्व

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवकालीन जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगड प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादरवाजाचे काम भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेले आहे. शिवकाळात जसे या महादरवाजाचे स्वरूप होते, हुबेहूब त्याच पद्धतीचा दरवाजा या ठिकाणी लावण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कारागीर दरबार सिंग यांनी दहा-बारा सहकाऱ्यांच्या मदतीने दोन महिने मेहनत घेऊन हा दरवाजा तयार केला. १६ फूट उंच आणि साडेदहा फूट रुंद असा हा सागवानी दरवाजा महादरवाजाच्या चौकटीत बसवण्यास दहा दिवसांचा कालावधी लागला. दरवाजा बसवण्याच्या कामात दरबार सिंग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी व पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.पूर्ण सागवानी असलेल्या या दरवाजाचे डिझाइन शिवकालीन दरवाजाशी मिळतेजुळते आहे. शत्रूंच्या हत्तींनी धडक देऊन तो तोडू नये, यासाठी दरवाजाला टोकदार खिळे असत, तसेच खिळे या दरवाजाला लावले आहेत. पर्यटकांना आत-बाहेर जाण्यासाठी दरवाजाला छोटे कवाड ठेवले आहे. त्यामुळे दरवाजाला भारदस्त स्वरूप मिळाले आहे.किल्ले रायगडावरील भवानी टोक हे अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. तेथे जाण्यासाठी असलेला मार्गही अत्यंत असुरक्षित आहे. या मार्गावरून भवानी टोकाला जाणाऱ्या पर्यटकांना अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हे अपघात रोखण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या धोकादायक मार्गालगत लोखंडी रेलिंग बसवण्याचेही काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)दरवाजा सूर्यास्त ते सूर्याेदयापर्यंत बंदहा दरवाजा बसवण्याचे काम सुरू असतानाच तो सूर्यास्त ते सूर्याेदयापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सर्वत्र प्रसारमाध्यमांतून प्रसारित केली जात आहे.- पुरातत्त्व कायद्यानुसार कोणत्याही संरक्षित वास्तूत सूर्यास्त ते सूर्याेदयापर्यंतच्या काळात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या कायद्याची पुरातत्त्व विभागाकडून अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्त्व विभागाने मात्र याबाबत अधिकृतपणे काहीच सांगितले नाही. त्यामुळे योग्य माहिती पुरातत्त्व विभागाने द्यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून के ली जात आहे.