शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सासवड माळी जमीन घोटाळ्याची चौकशी सहा महिन्यांत पूर्ण कर

By admin | Updated: February 14, 2015 03:48 IST

सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथील सासवड माळी साखर कारखान्याची ३,७५० एकर जमीन कमाल शेतजमीन धारणा कायद्यानुसार

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथील सासवड माळी साखर कारखान्याची ३,७५० एकर जमीन कमाल शेतजमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त ठरून हातची जाऊ नये, यासाठी सुमारे ५० वर्षांपूर्वी महसुली नोंदींमध्ये लबाडीने फेरफार करून झालेल्या घोटाळ्याची चौकशी येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.खरेतर राज्य सरकारने पुण्याच्या विभागीय उपायुक्तांना या कामी विशेष चौकशीचे अधिकारी नेमून चौकशी करण्याचा निर्णय १९८९ मध्येच घेतला होता. परंतु या जमिनीच्या कथित भाडेपट्टेधारकांनी व कारखान्याच्या भागधारकांनी कोर्टकज्जे केल्याने हे काम गेली २५ वर्षे रेंगाळले होते.मुंबई उच्च न्यायालयानेही सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचा व विभागीय उपायुक्तांना या चौकशीखेरीज अन्य कोणतेही काम न देण्याचा आदेश डिसेंबर २००६ मध्येच दिला होता. परंतु त्याविरुद्ध मधुकर साधबा शिवरकर, सुवर्णा विजयराव रासकर व रंजनाबाई मधुकर सपकाळ यांच्यासह इतरांनी केलेली अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. न्या. व्ही. गोपाळ गौडा व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने अपिले फेटाळून उच्च न्यायालयाचा आदेश कायम केला. एवढेच नव्हे तर ठरलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या जमिनींबाबत सर्व संबंधितांनी जैसे थे स्थिती ठेवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयात चार फौजदारी खटले चालून त्यात आरोपींना झालेली कारावासाची शिक्षा नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम झाली होती. त्यात समोर आलेल्या माहितीच्या आधारेच ही प्रशासकीय चौकशी करण्यात येत आहे.