शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात रेशीमगाठींचे सामुदायिक ‘कर्तव्य’भान!

By admin | Updated: May 2, 2016 00:35 IST

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात

- प्रताप नलावडे,  बीडमराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात गतिमान झाली आहे. एवढेच नव्हेतर ‘एक तिथी एक गाव’ या संकल्पनेवरही काही गावांमधून गांभीर्याने विचार सुरू आहे. दुष्काळाने कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेने सतावले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकाच मांडवाखाली अनेक जोडपी विवाहबद्ध झाली असून, संसारोपयोगी साहित्य भेटवस्तू स्वरूपात मिळाल्याने त्यांच्या खर्चाचीही बचत झाली. काही विवाह सोहळ्यांमध्ये ‘भू्रणहत्या करू नका’, ‘सुखी संसार करा’, ‘पत्नीला सुखाने नांदवा’ असे वडीलकीचे उपदेशही देण्यात आले. परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे ५४ जोडपी विवाहबद्ध झाली. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२ मुलींचा विवाह झाला. उद्योजक गौतम खटोड यांनी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात हा सोहळा झाला. खटोड यांनी स्वत:च्या मुलाचा विवाह या सोहळ्यात लावून त्याला चळवळीचे स्वरूप दिले. मुख्यमंत्र्यांची उपस्थिती!१७ एप्रिलला पालवण येथील चारा छावणीत ४१ मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास आवर्जून उपस्थित राहिले. ६ हजार जनावरांना आधार ठरलेल्या यशवंत सेवाभावी संस्थेचे राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी छावणीतच मांडव उभारून भावाची भूमिका निभावली. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या सोहळ्यात यंदा दीड हजार वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. अंबाजोगाईत गवळी समाज आणि ककैय्या समाजाच्या वतीने सामुदायिक सोहळा झाला. पाटोद्यात समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे तर माजलगावात बाळू ताकट या सर्वसामान्य तरुणाने फेबु्रवारीमध्ये विवाह सोहळ्याचा खर्च उचलला.जिल्हा बँक संचालक चंद्रकांत शेजूळ, अंबाजोगाईत मुस्लीम गवळी समाज, शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये ३० एप्रिलला तर अंबाजोगाईत वसुंधरा सेवा प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकारातून विवाह सोहळे होत आहेत.