शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 04:51 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदी पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.के. शहा यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे २ आॅगस्टच्या रात्री महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन एसटी बस गाड्या आणि काही खासगी बस वाहून गेल्याने ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप १६ जणांचा ठावठिकाणा लागलेला नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच ही दुर्घटना घडली होती. तेव्हा विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. विधिमंडळातील या आश्वासनानुसार एस.के. शहा यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून सहा महिन्यांत या समितीने आपला अहवाल सादर करावा, असा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच जारी केला आहे. कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट १९५२ च्या तरतुदीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे. सावित्री नदीवरील पूल वाहून जाण्यास कारणीभूत झालेली परिस्थिती व त्यावरील वाहने वाहून जाण्यास कारणीभूत परिस्थिती व घटनांचा क्रम लावणे, पूल वाहून जाण्यामागे नैसर्गिक कारणे होती की मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडली याची पडताळणी करणे, पूल वाहून जाण्यामागे तांत्रिक तपासणी अधिकारी जबाबदारी असल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी राज्य शासनाला कायमस्वरूपी करावयाच्या उपाययोजना सुचविणे तसेच त्याअनुषंगाने शिफारसी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)