शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

असे आहे आयुक्त कार्यालय !

By admin | Updated: July 25, 2014 00:53 IST

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात अनेक कल्पवृक्ष आणि काही चमत्कारिक स्थळे आहेत. कोणतेही तंत्रमंत्र न करताच भ्रष्टाचारी आणि त्यांच्या हस्तकांना या स्थळांवर पोहचताच झटपट नोटा (मोठी रक्कम) प्राप्त होतात.

परिसरात कल्पवृक्ष अन् चमत्कारिक स्थळे : भ्रष्टाचाऱ्यांना मिळतात झटपट नोटानरेश डोंगरे -नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात अनेक कल्पवृक्ष आणि काही चमत्कारिक स्थळे आहेत. कोणतेही तंत्रमंत्र न करताच भ्रष्टाचारी आणि त्यांच्या हस्तकांना या स्थळांवर पोहचताच झटपट नोटा (मोठी रक्कम) प्राप्त होतात. होय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी केलेल्या कारवाईनंतर ही चक्रावून टाकणारी माहिती उघड झाली. विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत अनेक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. जुने सचिवालय म्हणूनही ही इमारत ओळखली जाते. इमारतीच्या एका बाजूला सिंचन विभागाचे कार्यालय तर समोर जिल्हा परिषद आहे. थोड्या अंतरावरच नवीन प्रशासकीय इमारत असून, बाजूलाच जुनी प्रशासकीय इमारतही आहे. या इमारतींमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे येथे रोज हजारो नागरिकांचा राबता असतो. मोठी वर्दळ असल्याने येथे बाजारही भरतो. हॉटेल, चहा टपऱ्यांमध्ये झुनका भाकरीपासून आलुबोंडा-वड्यापर्यंतचे खाद्यपदार्थ अन् पालेभाज्यांपासून फळांपर्यंतची दुकानेही सजलेली पहायला मिळतात. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत या परिसरात गर्दी दिसते. विविध विभागांची कार्यालये असलेल्या याच परिसरात पोलीस नियंत्रण कक्ष आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) कार्यालय आहे. गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांचे आणि गुन्हेशाखेचे कार्यालय आहे. याच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेही कार्यालय आहे. त्यामुळे की काय भ्रष्टाचारी लोकसेवक आपल्या कार्यालयात किंवा कक्षात लाचेची रक्कम स्वीकारणे टाळतात. त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणं निश्चित केली आहेत. आयुक्त कार्यालयाच्या चोहोबाजूने छोटीमोठी झाडे आहेत. त्यातील काही झाडे भ्रष्ट लोकसेवकांसाठी कल्पवृक्ष ठरली आहेत.