शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

By admin | Updated: October 8, 2016 04:49 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे भाजपा सरकार आरक्षणविरोधी असून, मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत केवळ वेळकाढूपणा करीत आहे.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे भाजपा सरकार आरक्षणविरोधी असून, मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत केवळ वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.मुंबईत झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले आहे. परंतु काँग्रेस सरकारने धर्माच्या आधारे नाही, तर मागासलेपणाच्या आधारावर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेस सरकारने काढलेला अध्यादेश भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जाणीवपूर्वक व्यपगत केला. नवीन कायदा करू असे सांगूनही आता दीड वर्ष झाले आहे. यातून हा पक्ष किती खोटारडा आहे हे सिद्ध होते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांना व्होट बँक समजू नका; त्यांना समान वागणूक द्या, असे म्हणतात; मात्र त्याचवेळी राज्यातील भाजपा सरकार मुस्लीम समाजाच्या हक्काचे आरक्षण त्यांना देत नाही. यावरून भाजपाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)