शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

होड्यांच्या शर्यतीमध्ये कुलाबा कोळीवाड्याचा जलवा

By admin | Updated: March 6, 2017 04:57 IST

मुंबईचे भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांच्या विशेष शर्यतीमुळे पी-वन पॉवरबोट रेसिंगची रंगत वाढली

रोहित नाईक,मुंबई- मुंबईचे भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांच्या विशेष शर्यतीमुळे पी-वन पॉवरबोट रेसिंगची रंगत वाढली होती. पारंपारिक कोळी होड्यांच्या या शर्यतीमध्ये मुंबईतील निवडक ८ कोळीवाड्यांचा सहभाग लाभला. यामध्ये कुलाबा कोळीवाड्याने वर्चस्व राखताना एक लाख रुपयांच्या बक्षिसावर कब्जा करुन ‘दर्याचा राजा’चा मान मिळवला. जोरदार वारा आणि वेगवान लाटा यांना सामोरे जात स्पर्धकांनी आपआपल्या होड्या वेगात वल्हवण्याचे आव्हान पेलले. विशेष म्हणजे मुंबईकरांनी जोरदार प्रोत्साहन देत या ‘दर्याच्या राजांचा’ उत्साह आणखी वाढवला. दोन दिवस झालेल्या या विशेष शर्यतीमध्ये कुलाबा संघाने चमकदार कामगिरी केली. वर्सोवा आणि हाजी अली या कोळीवाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. या दोन्ही संघांना अनुक्रमे ६० आणि ३० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. कोळीवाड्यांच्या शर्यती झाल्यानंतर मुंबईकरांनी पॉवरबोट्सच्या तुफान वेगाचा थरार अनुभवला. दखल घेण्याची बाब म्हणजे, पहिल्यांदाच भारतात आयोजित होणाऱ्या या शर्यतीचा प्रत्यक्षपणे अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी रविवारची सुट्टी मरिन ड्राइव्हच्या किनारी घालवली. यामुळे दुपारच्या भर उन्हातही मुंबईची शान असलेल्या ‘क्वीन नेकलेस’ किनारा तुफान गर्दीने फुलला होता. अनेकांची पॉवरबोट्सचा थरार आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबध्द करण्यासाठी चढाओढ लागली होती. त्याचवेळी, पॉवरबोट्स जवळ आल्यानंतर जल्लोष करताना मुंबईकरांनी स्पर्धकांचा उत्साह देखील वाढवला. वेगाचा हा थरार अनुभवण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना सुर्याचा तडाखाही रोखू शकला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)>‘दृष्टी’चा जागतिक विक्रममुंबईत झालेल्या पी-वन पॉवरबोट रेसिंगच्या आयोजनाच्या निमित्ताने दृष्टी संस्थेने जागतिक विक्रमाची नोंद केली.या शर्यतीसाठी दृष्टी संस्थेने ५.२ किमी अंतराचा शर्यत मार्ग तयार करताना तब्बल ५ हजार ७०० तरंगते फुगे समुद्रामध्ये मांडले. विशेष म्हणजे यासह सर्वाधिक तरंगत्या फुग्यांच्या सहाय्याने समुद्रामध्ये शर्यतीचा मार्ग तयार करणारी पहिली संस्था म्हणून दृष्टीने गिनिज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला.