शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या घरावर ‘वारली’ची रंगरंगोटी

By admin | Updated: November 1, 2016 17:07 IST

मुलभूत सुविधांपासून कोसोदूर असलेल्या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरावर भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी करून,

ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.01 -  मुलभूत सुविधांपासून कोसोदूर असलेल्या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरावर  भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी करून, तरुणाईच्यावतीने दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी पाड्यातील आदिवासीं मुलांना कपडे आणि मिठाईचे देखील वितरण करण्यात आले.
सातपुड्याच्या पायथ्याशी  वसलेल्या चाळीसटापरी गावात दिपावलीपूर्वी अनेक आदिवासींच्या घरावर वारली चित्रांची रंगरंगोटी करण्यात आली. यासाठी खामगाव येथून तरुणाईच्या एका पथकासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चाळीसटापरी या आदिवासी गावात भेट दिली. यावेळी चाळीसटापरी येथील मुकेश, देविदास, जगदीश, अनिल यांच्यासह अनेक आदिवासीं बांधवांच्या घरावर आदिवासी चित्रशैलीतील त्यांचे जीवन, सणउत्सव, पर्यावरण संदेश या विषयावर ‘वारली’ चित्र रंगविण्यात आले. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवाना दिवाळीची मिळाई वितरीत करण्यात आली. त्याचप्रमाणे काही आदिवासी मुलांना दैनंदिन उपयोगी साहित्याचेही वितरण तरुणाईच्यावतीने करण्यात आहे. यावेळी तरुणाईचे मनजीतसिंह शिख, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर यांच्यासह तरुणाईचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या अनेक पदाधिकाºयांनी आपल्या घरी दिवाळी न साजरी करता, आदिवासी पाड्यातील सालईबन येथे आदिवासींसोबत दिवाळी साजरी केली.
 
वारली चित्राची रंगोटी करुन आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी करताना.
४आदिवासी जीवन शैलीतील ‘वारली’ चित्र शैलीचा आदिवासी पाड्यातील अनेकांना विसर पडला आहे. दरम्यान, तरुणाईच्यावतीने आदिवासी पाड्यातील विविध घरांवर वारली चित्र शैलीतून विविध चित्र रंगविण्यात आले. त्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींसाठी ही दिवाळी अतिशय नाविण्यपूर्ण ठरली.