शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत टवाळखोरी करणार्‍या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप

By admin | Updated: August 4, 2016 23:00 IST

तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून

ऑनलाइन लोकमतरावेर, दि. ४ - तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून परतलेल्या रावेर बस फेरीतील त्या अटवाडे येथील दोघा वाळखोरांना दुर्गावतार धारण केलेल्या खानापूरच्या युवतींनी खाली उतरवून चक्क चपलांनी चोप दिल्याने एकच खळबळ उडाली. खानापूर बसथांब्यावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रावेर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासाठी खानापूर येथून नियमीत ये - जा करणाऱ्या विद्यार्थीनींची मंगळवारला सायंकाळी परतीच्या प्रवासातील रावेर - अटवाडे एस टी बसमध्ये अटवाडे येथील काही महाविद्यालयातील व काही टवाळखोर अशा ४ युवकांनी टिंगलटवाळी व शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी दुर्गावतार धारण केलेल्या विद्यार्थींनींनी आज अटवाडे येथून परतलेल्या बसमध्ये त्या चौघांपैकी दोन टवाळखोर दिसताच त्यांना बसच्याखाली खेचून चपलांनी बदडत यथेच्छ धुलाई केली. ही घटना आज खानापूर बसथांब्यावर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, रावेर पोलीसांना घटनास्थळी बोलावून दोघे टवाळखोरांच्या साथीदारांनाही पोलीस ठाण्यात हजर करा अन्यथा बसचा चक्काजाम करतो असा इशारा संतप्त युवतींनी दिला. युवतींनी त्या टवाळखोर युवकांना बसद्वारे थेट रावेरला पोलीस ठाण्यात नेले. त्या चौघांनाही हजर करून त्यांची व त्यांचे पालकांची पोलीसांनी कानउघाडणी करून समज दिली.