शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅन्ड सर्जन्स अवैध

By admin | Updated: August 14, 2014 01:16 IST

मुंबई येथे मुख्यालय व नागपूरसह देशभरात १०९ शाखा असलेले कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅन्ड सर्जन्स अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनने मुंबई उच्च

हायकोर्टात याचिका : प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशनागपूर : मुंबई येथे मुख्यालय व नागपूरसह देशभरात १०९ शाखा असलेले कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅन्ड सर्जन्स अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका इंडियन मेडिकल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅन्ड सर्जन्स १९१६ पासून कार्यरत असून मुख्यालय व १०९ शाखांच्या माध्यमातून दरवर्षी १९०० विद्यार्थ्यांना एम.डी., एम.एस. अशा पदव्युत्तर पदवी व पदविका प्रदान करण्यात येतात. या कॉलेजला मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची मान्यता नाही. कौन्सिलने अधिसूचना काढून मान्यता रद्द केली आहे. असे असतानाही राज्य शासनाच्या परवानगीच्या बळावर कॉलेज सुरू आहे. कॉलेज व कॉलेजच्या परीक्षांवर कोणाचेही नियंत्रण नाही. विद्यार्थी प्रवेशाकरिता केंद्रीय स्तरावर परीक्षा घेतली जात नाही. परिणामी प्रवेशादरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करणे आवश्यक आहे. नागपुरातील डागा रुग्णालय, महात्मे रुग्णालय व लता मंगेशकर रुग्णालयात कॉलेजच्या शाखा आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. २ आॅगस्टच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ग्रामीण भागात डॉक्टरांची गरज असल्याचा मुद्दा मांडून कॉलेज सुरू ठेवण्याचे समर्थन केले, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, कॉलेज आॅफ फिजिशियन्स अ‍ॅन्ड सर्जन्स, केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)