शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बिबट्या’ ‘

By admin | Updated: January 3, 2015 00:12 IST

आम्हाला जगू द्या’ची मागणी : विजय जाधव यांचे अनोखे आंदोलन

कोल्हापूर : रुईकर कॉलनीत बिबट्या आल्याची घटना ताजी असतानाच आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातही एक बिबट्या शिरला; परंतु हा बिबट्या ‘ओरिजिनल’ नव्हता, तर बिबट्याची वेशभूषा केलेला प्राणिमित्र होता. बिबट्याची वेशभूषा साकारलेला इस्लामपूर तालुक्यातील साखराळेचा प्राणिमित्र विजय जाधव याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व वनविभागाच्या कार्यालयात जाऊन ‘आम्हाला जगू द्या’ अशी विनवणी केली. वन्य जिवांच्या संरक्षणासाठी केलेल्या या अभिनव आंदोलनामुळे नागरिकांत तो चर्चेचा विषय ठरला. रुईकर कॉलनीत काल, गुरुवारी आढळलेला बिबट्या वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत झाल्याचा आरोप जाधव यांनी केला. नागरी वस्तीत बिबट्या आला, तर त्याला पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा कोल्हापुरात नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्याचा निषेध व वन्य जिवांची हत्या थांबवावी, असा संदेश देण्यासाठी चक्क बिबट्याची वेशभूषा करून जाधव येथे आले. दुपारी दीड वाजता उड्या मारीतच हा ‘बिबट्या’ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला. कार्यालयात सर्वत्र फिरल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि मुख्य रस्त्यावरही गेला. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या आडवे जात त्याने ‘आम्हाला जगू द्या,आमचं घर कुठाय?’ अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. नंतर तो पोलीस अधीक्षक, वनविभाग कार्यालयात गेला. तेथेही त्याने वन्यजीव संरक्षणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अभिनव आंदोलनाबद्दल बोलताना विजय जाधव म्हणाले की, माझे आंदोलन ही मूक जनावरांची विनंती आहे. प्राण्यांचेही एक विश्व असते. त्यांचे कुटुंब असते. त्यांच्या व्यथा असतात. जंगली जनावर जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडते त्यावेळी त्याचीही कोणीतरी वाट पाहत असते. अशा जनावरांचे आपण संरक्षण केले पाहिजे, परंतु दुर्दैवाने जंगलात गावे वसत आहेत; त्यामुळे जनावरे मानवी वस्तीकडे येऊ लागली आहेत. रुईकर कॉलनीत सापडलेल्या बिबट्याला वन विभागाने व्यवस्थित हाताळले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाचा तो बळी ठरला, म्हणूच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)