शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी पॉवरफुल होणार

By admin | Updated: March 20, 2016 04:18 IST

शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेले कार्यक्रम आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पर्यवेक्षण, संनियंत्रण आणि समन्वयासाठी यापुढे जिल्हाधिकारी

- यदु जोशी,  मुंबईशासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेले कार्यक्रम आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पर्यवेक्षण, संनियंत्रण आणि समन्वयासाठी यापुढे जिल्हाधिकारी हे विभागप्रमुख असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी याबाबतचा आदेश जारी केला. सर्व विभागांकडील कार्यक्रम आणि योजनांसंदर्भातील कागदपत्रे, फायली अवलोकनासाठी बोलाविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या शिवाय, ते कुठल्याही विभागातील अ वर्ग अधिकाऱ्याच्या या योजना/कार्यक्रमांमधील योगदानाचे मूल्यमापन करतील. त्याचा समावेश संबंधित अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात (सीआर) करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणीच्या आघाडीवर काय परिस्थिती आहे, याबाबतचा मासिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा लागेल. सर्व विभागप्रमुखांनी आपल्या नियोजित दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांना आगाऊ पाठविणे अनिवार्य असेल. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष होत असल्यास किंवा योजना/कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत हयगय होत असल्यास विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश ते अधिकाऱ्यांना देऊ शकतील.मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. त्या वेळी, ‘शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वत:ला झोकून देण्याची आमची तयारी आहे, पण आम्हाला इतर विभागांबाबत अधिकार नसल्याने अडचणी येतात,’ असा सूर जिल्हाधिकाऱ्यांनी लावला होता. त्या बैठकीपासूनच जिल्हाधिकाऱ्यांना विभागप्रमुख करण्याचा विचार सुरू झाला.एसपी, जि.प.चे सीईओ वगळलेअनेक जिल्ह्यांमध्ये ‘मोठे कोण’ यावरून वाद झाल्याची उदाहरणे आहेत. भंडारा येथील जिल्हाधिकारी आणि तेथील पोलीस अधीक्षक यांच्यात झालेला संघर्ष गाजला होता. शनिवारी काढलेल्या आदेशात गृह विभाग आणि जिल्हा परिषदांकडील योजनांसाठी जिल्हाधिकारी हे विभागप्रमुख नसतील, असे स्पष्ट करीत, एसपी व जि. प. सीईओ यांचे सुभे कायम ठेवले आहेत.